Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तारखा जाहीर; पुण्यात रंगणार थरार

Maharashtra Kesari 2023: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तारखा जाहीर; पुण्यात रंगणार थरार

Maharashtra Kesari Date Declare: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने राज्यात रंगणाऱ्या मानाची स्पर्धा महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari) 66व्या हंगामाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा पुणे जिल्ह्याील (Maharashtra Kesari 2023 ) फुलगावमध्ये रंगणार आहे. या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 7 ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार ( Mahindra Thar ) जीप रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

7 नोव्हेंबर दिवशी सायंकाळी 5 वाजता स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. पुण्यातील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये साधारण 50 हजार प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडियम उभा करण्यात आलं आहे. शाळेचे संस्थापक दीपक पायगुडे यांनी स्टेडियमच्या व्यवस्थितसाठी सहकार्य केले आहे.

या स्पर्धेमध्ये 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी नोंदवणार आहेत. एका कुस्ती संघात गादी विभागातील 10 आणि माती विभागातील 10 असे एकूण 20 कुस्तीगीर 2 कुस्ती मार्गदर्शक आणि 1 संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जणांचा सहभाग राहणार आहे. साधारण या कुस्ती स्पर्धेमध्ये 840 कुस्तीगीर 84 कुस्ती मार्गदर्शक आणि 42 व्यवस्थापक, 80 पंच आणि 50 पदाधिकारी असे एकूण 1100 जणांचा सहभाग नोंदवला जाणार आहे.

Chitra Wagh : ‘त्या’ घटनेमागचे चेहरे गृहखातं समोर आणणारच; चित्रा वाघ यांचा इशारा

या कुस्तीगीरांचे आगमन, वैद्यकीय तपासणी आणि वजने दिनांक 6 नोव्हेंबर दिवशी करण्यात येणार आहेत. 7 नोव्हेंबर दिवशी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यानंतर कुस्त्यांना सुरुवात करण्यात येणार आहे. 10 नोव्हेंबर सायंकाळी 4 वाजता सर्व वजन गटातील अंतिम कुस्त्या आणि महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती पार पडणार आहे. स्पर्धेतील उर्वरीत वजन गटात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कुस्तीगीरास स्पेंडर दुचाकी, द्वितीय क्रमांकास रोख 20 हजार आणि तृतीय क्रमांकास 10 हजार अशी रोख बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत शासनाच्या वतीने प्रथम क्रमांकास 60 हजार, व्दितीय क्रमांकास 55 तर तृतीय क्रमांकास 50 हजार रूपयांचे मानधन दरवर्षी प्रमाणे देण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube