Download App

Satyajeet Tambe : मुख्यमंत्र्यांकडून केवळ घोषणा अमलबजावणी नाही; अंगणवाडी सेविकांप्रकरणी तांबेंचा निशाणा

Satyajeet Tambe : आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी राज्यभरात अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे आंदोलन होत आहे. त्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून संपावर गेल्या आहे. राज्यभरात अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे आंदोलन होत आहे. आतापर्यंत या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे सरकारने काणाडोळा केला. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असली, तरी त्याची ठोस अमलबजावणी अद्यापही झालेली नाही, अशा शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Sonakshi Sinha : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या सोज्वळ लूकवर चाहते फिदा

अंगणवाडी सेविकांच्या काही संघटनांनी आ. तांबे यांची भेट घेतली. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून आपण भविष्यातही अंगणवाडी सेविकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा निर्धार सत्यजीत तांबे यांनी या वेळी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला आहे.

‘सत्ताधारी आमदार असलो तरी समाजाच्या न्यायासाठी लढणार’, आरक्षणावर लंकेंचे मोठे विधान

तांबे म्हणाले, राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सरकार दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. दोन वर्षे झाली तरी सरकारने सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. शालेय तसंच उच्च शिक्षणासोबतच बाल शिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे. या बाल शिक्षणात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे प्रश्न प्रदीर्घ काळासाठी प्रलंबित राहणं, योग्य नाही. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, अशी भूमिका आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.

आजवर अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे या सरकारने काणाडोळा केला. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र घोषणा करण्यात आली आली तरी ठोस अमलबजावणी अद्यापही झालेली नाही. आता येत्या हिवाळी अधिवेशनात अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मी सभागृहात मांडणार असून त्यांना पुरेपूर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, अशी गवाही यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.

जाणून घ्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या?

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सन्मानजक वेतनवाढ, दरमहा पेन्शन याविविध मागण्यांसाठी अनेक महिन्यांपासून राज्यभर आंदोलने सुरू आहेत. 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका बेमूदत संपावर गेल्या आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज