आधी नियमित भरतीचे आश्वासन, आता कंत्राटी भरतीचा विषय काढून…; सत्यजित तांबेंची टीका

  • Written By: Published:
आधी नियमित भरतीचे आश्वासन, आता कंत्राटी भरतीचा विषय काढून…; सत्यजित तांबेंची टीका

Satyajit Tambe on contract basis recruitment : शासकीय कार्यालयात काम करण्यासाठी आतापर्यंत विविध परीक्षांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने भरती (Recruitment on contract basis) करण्याचा जीआर काढला आहे. या निर्णयामुळं सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. आता विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनीही शासकीय-निमशासकीय पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करू नये, अशी मागणी केली.

दोन दिवसांपूर्वा राज्य सरकारने राज्यातील गट ब, क आणि ड श्रेणीतील पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्य सरकारने नऊ खासगी कंपन्याना हे काम दिले आहे. याविषयी बोलतांना सत्यजित तांबे म्हणाले की, राज्य शासनाने कंत्राटी पद्धतीने सरकारी कर्मचारऱ्यांची भरती करण्याबाबत एक शासन निर्णय काढला. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्णाण झाला. स्पर्धा परिक्षांचे विद्यार्थी, शिक्षक, किंवा अन्य विभागातील लोक जे सरकारी नोकरीकडे एक आशा म्हणून म्हणून पाहतात, त्यांचा अपेक्षाभंग करणारा हा निर्णय आहे. आज या कंत्राटी म्हणून घेतलं, तर आणखी पाच-सात वर्षांनी हेच मुलं कायमस्वरूपी तत्वार घ्या, अशी मागणी करतील. त्यामुळं प्रश्न आणखी बिकट होईल.

भारतीयांनी इनरवेअर घालणं बंद केलं? रुपा ते जॉकीपर्यंत बड्या कंपन्यांच्या विक्रीत मोठी घसरण 

ते म्हणाले, पुण्यातल्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन न्याय मागण्यांसाठीच आहे. सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाचा फटका या तरुणांनाच मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. सरकारने पोर्टलद्वारे नियमित भरतीचे आश्वासन दिले असताना आता कंत्राटी भरतीचा विषय काढून सरकार या मुद्द्याला फाटे फोडत आहे. सरकारने शिक्षकभरती किंवा शासकीय-निमशासकीय पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करू नये, असं तांबे म्हणाले.

सरकारने कंत्राटी पद्धतीने थेट भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा जीआरही जारी करण्यात आला आहे. उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचा हा घोर विश्वासघात आहे. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून होणारी नोकरभरती ही केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी असल्याची टीका विद्यार्थी करत आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube