‘सत्ताधारी आमदार असलो तरी समाजाच्या न्यायासाठी लढणार’, आरक्षणावर लंकेंचे मोठे विधान

  • Written By: Published:
‘सत्ताधारी आमदार असलो तरी समाजाच्या न्यायासाठी लढणार’, आरक्षणावर लंकेंचे मोठे विधान

अहमदनगर : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार असे दिसून येत आहे. यातच सत्ताधारी आमदार देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सभागृहाच्या बाहेर मराठा आरक्षणाबाबत भाष्य केले. आम्ही सत्ताधारी सरकारमधील आमदार जरी असलो तरी मात्र आपल्या समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तसेच आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढलो पाहिजे, असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही आज अधिवेशनाच्या दिवशी याची मागणी सभागृहात करणार आहोत असं लंके म्हणाले. तसेच सरकारने समाजाला दिलेला शब्द पाळतील असा विश्वासही लंके यांनी व्यक्त केला.

Nagpur : स्वतःची झोळी रिकामी अन् शिंदेंच्या शिलेदारांची ठाकरेंच्या आमदाराला ऑफर 

विधिमंडळाचं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या अधिवेशन काळात विविध मुद्दे चर्चेत आले आहेत. यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात गाजणार असे दिसून येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. त्यापूर्वीच हे अधिवेशन होत आहे. यामुळे सभागृहात या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

‘पुष्पा’ फेम अभिनेता जगदीश प्रतापला अटक, महिलेच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप 

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण केले. त्यानंतर सरकारला डेडलाईन दिल्यानंतर त्यांनी राज्यभर आपले दौरे सुरु केले. यातच आता यंदाच्या वर्षातले शेवटचे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सत्ताधारी पक्षातील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार निलेश लंके यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना लंके म्हणाले, मराठा आरक्षणाबाबतची लढाई सुरु असून याचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उठवला पाहिजे. आम्ही मागच्या अधिवेशनात देखील आम्ही आंदोलन केलं होत. सत्ताधारी आमदारांना आंदोलन करण्याची वेळ येतेय, याविषयी विचारले असता लंके म्हणाले, आम्ही जरी सत्ताधारी पक्षातील आमदार असलो तरी समाजाच्या न्यायासाठी आम्हीही लढलो पाहिजे ही आमची भूमिका आहे. तसेच सरकार आरक्षणाबाबतचा शब्द पाळतील असे आम्हांला विश्वास आहे असे यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले.

लंके यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाहीतर हिवाळी अधिवेशन बंद पाडू, असा इशाहारी दिला होता. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ओबीसी नेत्यांनी विरोध केला.असं असलं तरी जरांगे पाटील आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यामुळं हिवाळी अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्द्यावर काय तोडगा निघतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube