‘पुष्पा’ फेम अभिनेता जगदिश प्रतापला अटक, महिलेच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप

‘पुष्पा’ फेम अभिनेता जगदिश प्रतापला अटक, महिलेच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप

Pushpa Actor Jagdish Bandari Arrested : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ब्लॉकबस्टर ‘पुष्पा : द राईज’ (Pushpa ) या सिनेमा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पंजागुट्टा पोलिसांनी अभिनेता जगदिश प्रताप बंदरीला (Jagdish Bandari )अटक केली आहे. ‘पुष्पा द राइज’ या ब्लॉकबस्टर पॅन-इंडिया अॅक्शन ड्रामामध्ये अल्लू अर्जुनच्या मित्र केशवची भूमिका साकारून जगदिश प्रसिद्ध झाला. पुष्पा फेम अभिनेता जगदिशवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

30 वर्षीय जगदिश प्रताप एका ज्युनियर आर्टिस्टसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या महिलेने 29 नोव्हेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत जगदिशला जबाबदार धरले. तक्रार आणि तपासाच्या आधारे पुष्पा फेम अभिनेत्याला बुधवारी कलम 306 अन्वये अटक करण्यात आली. मृत महिला ही एक कलाकार देखील होती, तिने काही लघुपटांमध्ये काम केले होते.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

या महिलेने 29 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. पोलिस तपासादरम्यान, पुंजागुट्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदिशने मृत महिलेची व्हिडिओ क्लिप 27 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या पुरुषासोबत असताना बनवली होती. जगदीशने महिलेला ब्लॅकमेल केले आणि तिचे वैयक्तिक फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली, त्यानंतर तिने तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूनंतर जगदिश हा फरार होता आणि अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सध्या पोलिसांनी पुष्पा फेम अभिनेत्याला रिमांडवर घेतले आहे. सध्या हैदराबाद पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

रणबीरच्या Animal बद्दल ‘या’ इंटरेस्टींग गोष्टी माहितीये का? जाणून घ्या, चकित व्हाल!

जगदिशचा शेवटचा मिथरी मूव्ही मेकर्सच्या छोट्या बजेट नाटक, सत्थी गनी रेंदू येकरलू’ मध्ये दिसला होता. तो लवकरच नीतिन आणि श्रीलीला यांच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन आणि लवकरच प्रदर्शित होणार्‍या ग्रामीण नाटक, अंबाजीपेटा मॅरेज बँडमध्ये दिसणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube