रणबीरच्या Animal बद्दल ‘या’ इंटरेस्टिंग गोष्टी माहितीये का? जाणून तुम्ही व्हाल चकित!

रणबीरच्या Animal बद्दल ‘या’ इंटरेस्टिंग गोष्टी माहितीये का? जाणून तुम्ही व्हाल चकित!

Animal : सध्या रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल (Animal) चित्रपटाने धुमाकुळ घातला आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टींग गोष्टी सांगणार आहोत. ज्या ऐकूण तुम्ही चकित व्हाल. काय आहेत या गोष्टी? पाहुयात… पहिली गोष्ट म्हणजे सुरूवातीला या चित्रपटाचं नाव ‘अ‍ॅनिमल’ नाही तर ‘डेव्हील’ ठेवण्यात आलं होतं. तसेच चित्रपट साऊथमध्ये रिलीज करण्यात येणार होता.

Rohit Pawar : ‘भाषणं देण्यापेक्षा पद सोडा’; रोहित पवारांनी भुजबळांना सुनावलं

त्याहूनही इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे जो रणबीर कपूर हा चित्रपट गाजवतोय. त्याचं या चित्रपटासाठी कास्टींगच करण्यात येणार नव्हतं. तर त्याच्या ऐवजी साऊथचा सुपरस्टार महेशबाबूला घेण्यात येणार होतं. पण आपल्या चाहत्यांना अशी स्क्रिप्ट आवडणार नाही. म्हणून त्याने चित्रपटाला नकार दिला. तर या चित्रपटाच्या काही सीन्सचं शूटींग अभिनेता सैफ अली खान यांच्या पदौती पॅलेसमध्ये करण्यात आलं आहे. तसेच चित्रपटाचा टायमिंग हा देखील सध्याच्या चित्रपटांना अपवाद आहे. कारण सध्या चित्रपटाचा टाईम फार फार तर अडिच तास ठेवण्याचा ट्रेंड असताना, हा चित्रपट तब्बल तीन तास 21 मिनिटांचा आहे. त्यामुळे चित्रपटाला थिएटरमध्ये केवळ दिवसाचे 3 चं शो मिळत आहेत.

Fighter Movie: मार्फ्लिक्स निर्मित “फायटर”चा दमदार टीझर लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आणखी एक फॅक्ट म्हणजे चित्रपटातील ‘सारी दुनिया जला देंगे’ हे गाणं पारंपारिक गाणं असलेल्या ‘बागे विच आया करो’ या गाण्याप्रमाणे करण्यात आलं आहे. तसेच या चित्रपटाची कथा एल्गार या चित्रपटावरून घेण्यात आली आहे. जसं कबीर बेदी आणि संजय दत्त यांच्या एल्गारमध्ये एक मुलगा आपल्या वडिलांचं लक्ष वेधण्यासाठी गुंड बनलेला असतो. जे अगदी हुबेहुब अ‍ॅनिमलमध्येही दाखवण्यात आलं आहे.

अ‍ॅनिमलच्या एका सीनमध्ये रणबीर गॅलरीमध्ये फायटींग करत असलेला सीन 2003 मध्ये आलेल्या साऊथ कोरियन फिल्म ओल्ड बॉयमधून घेण्यात आला आहे. तसेच चित्रपटात दाखवलेली मशीनगन ही 500 किलोंची असून तिला बनवण्यासाठी 1 कोटी रूपये लागले आहेत. तर एका फायटिंग सीनमध्ये रणबीर ज्या मास्क मॅन्सशी लढत आहे. हे तब्बल 800 मास्क खास काचेच्या कोटींगपासून बनवलेले आहेत.

तसेच चित्रपटाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाने रिलीजच्या अगोदरच साडे बारा कोटी कमावले. ज्यामुळे अ‍ॅडव्हांन्स बुकींगच रेकॉर्ड तोडलं. चित्रपटात सर्वांना भावला तो बॉबी देओलचा व्हिलन अवतार. कारण चित्रपटात त्याने एक खतरनाक व्हिलन निभावला तो देखील न बोलता होय कारण चित्रपटात बॉबी देओलला बोलता येत नाही. तर मंडळी कशा वाटल्या अ‍ॅनिमल चित्रपटाबद्दलच्या इंटरेस्टींग गोष्टी तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का? तर तुम्हाला माहिती असलेल्या या चित्रपटाच्या अशाच आणखी इंटरेस्टींग गोष्टी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube