Rohit Pawar Criticized Ram Shinde : विधानपरिषदेचे सभापती होणे खूप मोठे भाग्य आहे. पण त्या संवैधानिक पदाचा काही शिष्टाचार असतो. तो शिष्टाचार प्रा. राम शिंदेंना (Ram Shinde) कुणी तरी शिकवावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना सभापतिपदाचे कामकाजच माहिती नाही असे सुचित केले आहे.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर शाब्दीक टीका केली आहे. यावेळी बोलताना पवार म्हणाले, मी तर एक आमदार आहे मी काहीही बोलू शकतो मात्र एखादा सभापती पदावर गेल्यावर ते संविधानिक पद आहे. त्या पदावर असताना तुम्हाला राजकीय कार्यक्रमाला जाता येत नाही तसेच राजकीय वक्तव्ये करता येत नाहीत. माध्यमांशी राजकीय वक्तव्य करता येत नाही.
औरंगजेबाच्या कबरीला हात लावला तर.. रोहित पवारांनी दिला गंभीर इशारा, राजकारण तापतंय
राम शिंदे विधानपरिषदेचे सभापती आहेत. ते कसे, कोणामुळे, कोणाच्या विरोधात लढून सभापती झाले हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना विनंती करणार आहे की सभापतिपदाचा शिष्टाचार काय असतो हे जे आता विधानपरिषदेचे सभापती झाले आहे त्यांना शिकवा असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये औरंगजेब 27 वर्षे राहिला आहे. त्यानंतर देखील त्याला महाराष्ट्रात राज्य करता आलेलं नाही. याचचं प्रतिक म्हणून खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबरीला हात न लावणंच योग्य ठरेल. ही कबर (Rohit Pawar News) आज आपण उखडून टाकली तर भविष्यामध्ये लोक गडबड करतील, त्यामुळे कबरीला हात न लावण्याचं आवाहन रोहित पवारांनी केलं.
यापूर्वी शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी देखील औरंगजेबाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असल्याचा दावा केला होता. हा इतिहास पुढील पिढीला कळला पाहिजे, त्यामुळे कबर हटवू नका, असं म्हणाले होते.
Video : औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली; SRPF तैनात, बजरंग दलाच्या इशाऱ्यानंतर कारवाई