Video : औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली; ‘SRPF’ तैनात, बजरंग दलाच्या इशाऱ्यानंतर कारवाई

Video : औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली; ‘SRPF’ तैनात, बजरंग दलाच्या इशाऱ्यानंतर कारवाई

Aurangzeb Tomb Secured : एकीकडे देशभरात छावा चित्रपटाची धूम पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीके छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजीराजेंना किती निर्घुणपणे ठार मारण्यात आल्याचा इतिहास पाहून तीव्र संतापही व्यक्त होत आहे. (Aurangzeb) छत्रपती संभाजीराजेंची हत्या करणाऱ्या आरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे बांधण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारच्या पुरातत्व विभागाकडून याची देखभालही होत आहे.

औरंगजेबाच्या कबरीचा करेक्ट कार्यक्रम होणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा

छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान, त्यांच्यावर औरंगजेबाकडून झालेल्या अत्याचाराच्या इतिहासाची आठवण घेत काही हिंदुत्त्वावादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच, या संघटनानी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. औरंगजेबच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस वाढवण्यात आला असून एसआरपीची एक तुकडी कबरीच्या घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. कबरीच्या ठिकाणी दोन पोलीस अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तात तैनात करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी आज कबर परिसरात व आतमध्ये जाऊन पाहणी केली.

कबर परिसरातील दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, दोन ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. तसंच, कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला चेक करूनच सोडले जात आहे. पोलीस उपअधीक्षक यांनी कालच कबरीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर, आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून ही कबर हटविण्याची मागणी करत इशारा देण्यात आल्याने येथील बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

तुळसही लावली

औरंगजेबाला दक्षिणेतील मोहीमेत अपेक्षेच्या उलट मराठ्यांनी कडवी झुंज दिल्याने एवढ्या प्रदीर्घ आणि खर्चिक मोहिमेतून त्यांना काहीच साधता आले नाही. औरंगज़ेबांचा ३ मार्च, इ.स. १७०७ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर येथे मृत्यू झाला. औरंगजे़बानंतर मुघल साम्राज्याला हिंदुस्तानवर कधीच अधिराज्य गाजवता आले नाही. त्यांची कबर खुलताबाद येथे आहे. आपली समाधी गुरु शेजारीच असावी अशी औरंगजेबाची इच्छा होती, त्यामुळे तेथे कबर आहे. औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याची कबर खुलताबादेत मातीची बांधली. आता तिथे असलेली संगमरवरी जाळी ही निजामाने लावली आहे. औरंगजेबाच्या मातीच्या कबरीवर तुळस देखील लावलेली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube