‘औरंगजेबाच्या कबरीला हात लावला तर…’ रोहित पवारांनी दिला गंभीर इशारा, राजकारण तापतंय

Rohit Pawar Warning On Aurangzeb Tomb To Bajarang Dal : मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलंच तापलंय. भाजप मंत्री नितेश राणे यांनी ही कबर उखडून टाकण्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे खुलताबाद येथे कबर परिसरात (Aurangzeb Tomb) मोठा बंदोबस्त आहे. तर याउलट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कबरीला हात न लावण्याचं वक्तव्य केलं आहे.
रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये औरंगजेब 27 वर्षे राहिला आहे. त्यानंतर देखील त्याला महाराष्ट्रात राज्य करता आलेलं नाही. याचचं प्रतिक म्हणून खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबच्या कबरीला हात न लावणंच योग्य ठरेल. ही कबर (Rohit Pawar News) आज आपण उखडून टाकली तर भविष्यामध्ये लोक गडबड करतील, त्यामुळे कबरीला हात न लावण्याचं आवाहन रोहित पवारांनी केलंय.
…तर हिंदू तुम्हाला औरंगजेबाच्या थडग्यात पुरल्या शिवाय राहणार नाही; भातखळकर विरोधकांवर संतापले
यापूर्वी शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी देखील औरंगजेबाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असल्याचा दावा केला होता. हा इतिहास पुढील पिढीला कळला पाहिजे, त्यामुळे कबर हटवू नका, असं म्हणाले होते.
तर दुसरीकडे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी सुद्धा नुकतंच औरंगजेबची कबर काढून टाकण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर रोहित पवारांनी आज कबरीला हात न लावण्याचं भाष्य केलंय. त्यामुळे शरद पवार गटात अंतर्गत मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय. तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी देखील औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी केलीय. अन्यथा बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा दिलाय.
दुसरीकडे, विश्व हिंदू परिषदेने आज अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी औरंजगेबाची कबर काढण्यासंदर्भात 17 तारखेला सर्वच जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे औरंगजेब कबर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला गेलाय. कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चेक करून सोडलं जात असल्याची माहिती मिळतेय.