Download App

आम्हाला बी टीम म्हणणारे वाघचौरे 2019 ला कुणाची बी टीम होते?, रुपवतेंचा हल्लाबोल

शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी कोपरगाव येथे प्रचार सभेत बोलताना भाऊसाहेब वाघचौरेंवर जोरदार टीका केली.

Utkarsha Rupwate : विरोधकांनी कशीही टीका केली तरी आपण विकासावर बोलायचं असं ठरवलं होतं. परंतु, वयक्तिक आरोप करत आहेत. माझ्यापर्यंत येण्याची हिंमत नाही म्हणून गाडीवर दगडफेक केली. (Shirdi Lok Sabha) परंतु, या हल्लावरून लक्षात आलंय की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तसंच, त्यांनी हल्ला केल्यानंतर आता माझीही सटकली आहे अशा शब्दांत शिर्डी लोसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी विरोधकांवर हमला चढवला आहे.  त्या प्रचार सभेत बोलत होत्या. या सभेला वंचित आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरही उपस्थित होते.

 

करारा जवाब मिलेगा वाहनावर हल्ला, बॅनर फाडल्यावरुन रुपवतेंचा कडक इशारा

मग वाघचौरे कोण आहेत?

आज जे मोठ्या मोठ्या गप्पा मारतात ते भाऊसाहेब वाघचौरे 2019 ला अपक्ष उभा होते. तेव्हा मात्र त्यांना कुणी बी टीम म्हणालं नाही. परंतु, आमच्यावर वारंवार बी टीम म्हणून टीका केली जाते. परंतु, या बी टीम म्हणणाऱ्यांना मी सांगते आम्ही बी टीम आहोत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची, बाळासाहेब आंबेडकरांची अशा शब्दांत रुपवते यांनी बी टीम या टीकेला उत्तर दिलं आहे. तसंच, वाघचौरेंना काय अधिकार आहे आम्हाला बी टीम म्हणण्याचा असंही त्या यावेळी म्हणाल्या.

 

करेक्ट कार्यक्रम करणार

महिला धोरण आणलं. महिला सबलीकरण केलं असं म्हणाऱ्या कोणत्याही नेत्याने माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला नाही. हा हल्ला काय माझ्या एकटीवर नसून राजकीय क्षेत्रात काहीतरी करू पाहणाऱ्या सर्व स्त्रीयांवर हल्ला होता असंही रुपवते यावेळी म्हणाल्या. तसंच, तुम्ही एका महिलेवरील हल्ल्याचा निषेध करू शकत नाही तर कशाला महिला सबलीकरणाचं बोलता असंही त्या यावेळी म्हणाल्या. परंतु, मी असल्या हल्ल्याला घाबरत नाही. तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार असा इशाराही रुपवते यांनी यावेळी दिला आहे.

 

मोठी बातमी! उत्कर्षा रुपवतेंच्या वाहनावर दगडफेक; हल्लेखोर पसार, पोलिसांत तक्रार

घ्यायच तर घ्या

विरोधक घाबरलेले आहेत. मी कितीही हल्ले झाले तरी घाबरणार नाही. ही नारी देघांनाही भारी पडणार आहे असंही रुपवते म्हणाल्या आहेत. आज आमच्यासोबत सर्व समाजातील घटक आहेत असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसंच, आमदार कपील पाटील यांच्या गणराज्य पक्षाने मला पाठिंबा दिला आहे. कारण वाघचौरे जे करू शकत नाहीत ते रुपवते करू शकते म्हणून हा पाठिंबा दिला आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसंच, शेवटच्या दिवसांत येतील. पण अमिषाला बळी पडू नका असं सागतानाच रुपवते यांनी “काही घ्यायचं असेल तर घ्या, माझं काही म्हणणं नाही” मात्र, मतदान कुणाला करायचं हे लक्षात ठेवा असंही रुपवते यावेळी म्हणाल्या.

follow us