‘करारा जवाब मिलेगा…’; वाहनावर हल्ला, बॅनर फाडल्यावरुन रुपवतेंचा कडक इशारा

‘करारा जवाब मिलेगा…’; वाहनावर हल्ला, बॅनर फाडल्यावरुन रुपवतेंचा कडक इशारा

Utkarsha Rupawate : शिर्डी लोकसभेत (Shirdi Loksabha) मतदानापूर्वीच राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रूपवते (Utkarsha Rupawate) यांच्या वाहनावर काही दिवसांपूर्वी अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली होती. आता संगमनेरमधील साकुर पठार भागात त्यांचे बॅनर्स देखील फडण्यात आले. मात्र, विरोधकांना निवडणुकीमध्ये ‘करारा जवाब मिलेगा’ असे म्हणतच रुपवते यांनी विरोधकांना इशारा दिला.

मोठी बातमी : द.आफ्रिकेत मोठा अपघात; प्रवाशांना घेऊन जाणारे बोइंग 737 विमान धावपट्टीवर कोसळले

शिर्डी लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. शिर्डीमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा सामना असताना वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने चुरस निर्माण झाली आहे. मतदान जसजसे जवळ येऊ लागले आहेत तसे वातावरण देखील तापू लागले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार रुपवते या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फिरत असताना त्यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची घटना घडली. राजकीय स्पर्धेतून ही हल्ला झाल्याची घटना घडल्याची देखील चर्चा वर्तुळात रंगली होती.

‘अपना सपना मनी-मनी’चे लोकप्रिय दिग्दर्शक संगीत सिवन कालवश, 61व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आजींकडून केवळ टीका टीप्पणी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत, मात्र आपण विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहोत. मात्र, केव्हा राजकीय स्पर्धेतून पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यातील साकुर भागामध्ये रूपवते यांच्या प्रचाराचे पोस्टर बॅनर फाडण्यात आल्याची देखील घटना घडली. या घटनेनंतर आता रूपवते यांनी सोशल मीडियाद्वारे या घटनेची निंदा करत विरोधकांना सणसणीत टोला लगावलायं.

‘घड्याळ चोरणाऱ्यांचं घड्याळ 10 : 10 वाजता बंद पडणार’; कराळे गुरुजींच्या निशाण्यावर अजितदादा!

यावेळी विरोधकांवर ते हल्लाबोल करताना रूपवते म्हणाल्या, माझे प्रतिस्पर्धी भिरभिरले आहेत, त्यांच्याकडे अमाप पैसा आणि सत्ता आहे, पण जनतेचा पाठिंबा नाही. माझ्याकडे फक्त जनतेचा पाठिंबा आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी समोर येऊन मला थांबू शकत नाही. विरोधक कधी रात्री माझ्या चालत्या गाडीवर दगडफेक करतात तर कधी माझे पोस्टरही फाडून टाकतात. मात्र, विरोधकांनी कितीही डावपेच आखले तरी ते यशस्वी होणार नाही. कुरगुडे करणाऱ्यांना करारा जवाब मिलेगा… अशा फिल्मी डायलॉगमध्येच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांनी आपल्या विरोधकांना कडक इशारा दिलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube