Download App

रामदास आठवले शिर्डी लोकसभा लढवणारच…तयारी झाली; साळवेंनी स्पष्ट सांगितलं

Image Credit: Letsupp

Shirdi Loksabha : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. याचा शिर्डी लोकसभेसाठी देखील आता राजकीय पक्षांकडून चाचणी सुरू आहे दरम्यान आरपीआयचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavle) शिर्डी मतदारसंघातून लोकसभा लढवणारच, याबाबतची सर्व तयारी झाली असून निर्णय सुरू आहे अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिली.

समुद्र किनारी धम्माल करणाऱ्या श्रीदेवी प्रसन्नची BTS झलक पाहिलीत? पाहा फोटो

आरपीआय आठवले गटाची पत्रकार परिषद पार पडले असून यावेळी सुनील साळवे यांनी शिर्डी लोकसभा निवडणुकीवर महत्त्वाचे भाष्य केले. यावेळी बोलताना साळवे म्हणाले की, आमचे नेते रामदास आठवले हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच आहेत. तसेच याबाबत तयारी देखील झाली आहे. निवडणुकीबाबत वरिष्ठ पातळीवर आमचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना भेटलेले आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवरती निर्णय होणार असून शिर्डी लोकसभा मतदारसंघसोबतच आणखी एक मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने महाराष्ट्रातला लढावा अशी आरपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मागणी आहे. आगामी निवडणुका पाहता आरपीआय गटाला दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी केली असल्याची माहिती देखील यावेळी साळवे यांनी दिली.

अहमदनगरच्या गोविंददेव गिरी महाराजांनी करवून घेतला PM मोदींकडून ’11 दिवसांचा’ उपवास…

आठवलेंच्या जिल्हा दौऱ्यापूर्वीच आठवले गटात घमासान :
केंद्रीय मंत्री रामदास आठवले येत्या 3 फेब्रुवारी रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा अगदी तोंडावर आलेला असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गटात जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून पक्षांतर्गत घमासान सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आठवले यांच्या दौऱ्याच्या तयारी निमित्ताने नुकतीच राहुरी इथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत कर्जत तालुक्यातील संजय भैलूमे यांची नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र या निवडीवर दक्षिण जिल्ह्यध्यक्ष पदावर कार्यरत असलेले सुनील साळवे यांनी आक्षेप घेतला आहे.

याबाबत सुनील साळवे यांनी रामदास आठवले यांना पत्र पाठवून जिल्ह्यात संपर्कप्रमुख भालेराव यांच्या माध्यमातून मनमानी पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे आणि त्यामुळे पक्ष संघटना चालवण्यात येत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला आहे. पत्रात आर्थिक हित पाहून निर्णय होत असल्याचा गंभीर आरोप असल्याने तसेच जिल्हाध्यक्ष पदावरील निर्णय पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचे सांगण्यात आल्याने याबाबत थेट राज्य निवडणूक आयोगाकडे जाण्याची भूमिका सुनील साळवे यांनी दिली आहे.

follow us

वेब स्टोरीज