Download App

पिपाडांची एक घोषणा अन् विखेंना टेन्शन; शिर्डीसाठी रणशिंग फुंकलं…

भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचं टेन्शन वाढलंय. शिर्डी भाजपमध्ये बंडखोरी होणार असल्याचं बोललं जात आहे.

Ahmednagar News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं (Vidhansabha Election) वेध लागल्याची परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांकडूनही चाचपणी सुरु झालीयं. अशातच आता शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण शिर्डी विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) हे विद्यमान आमदार असताना भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा (Rajendra Pipada) यांनी दंड थोपडले आहेत. मी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याची घोषणा पिपाडा यांनी घोषणा केलीयं. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपात बंडखोरीच होती की काय? अशी चर्चा सध्या रंगलीयं.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘या’ कारणाने कोकण हार्टेड गर्ल अंकिता ढसाढसा रडली, निक्की तांबोळीसोबत बाचाबाची

काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार सुजय विखे यांचा अहमदनगर लोकसभा निवडणुकी पराभव झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभेत विखे घराण्याला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही विखेंविरोधात प्रतिस्पर्धी तयारी करीत आहेत. विखे पाटील यांच्याबाबत शिर्डी विधानसभा मतदारसंघात जनतेच्या मनात नाराजी आणि रोष असल्याचा दावा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर आणि शिर्डी अशा दोन्ही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विखे पाटील स्वत: निवडून येणार नसल्याची भावना मतदारसंघात निर्माण झाल्याने जनतेचा कौल पाहून मीच विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं राजेंद्र पिपाडा यांनी स्पष्ट केलंय.

अजित पवार विष्णूदास तर फडणवीसांमुळे मराठी माणसाला सुख नाही; संजय राऊतांचं टीकास्त्र

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात जनतेत नाराजी व रोष आहे. मंत्री विखे हे पालकमंत्री असताना यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या दोन्ही जागांवरील उमेदवारांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत ते स्वतः निवडून येणार नाही अशी जनभावना आहे, यामुळे आपण विधानसभा निवडणूक लढवावी, असा जनकौल पाहता मी विधानसभेसाठी शिर्डीमधून इच्छुक असल्याचं भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी म्हंटले आहे.

घराणेशाहीमुळे शिर्डीचा विकास खुंटला…
शिर्डी मतदारसंघातून उमेदवार बदलला तर शिर्डीची जागा वाचेल. या मतदारसंघात केवळ घराणेशाहीच सुरु असल्याने शिर्डीचा विकास खुंटला आहे. लोकांकडून आग्रह आहे जनतेच्या इच्छेला प्रतिसाद देत शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हणतच पिपाडा यांनी आपणास उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षातील वरिष्ठांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले. मी या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचंही पिपाडा यांनी सांगितलं.

follow us