अहमदनगरच्या लग्नाची राज्यभर चर्चा; स्मशानात घेतल्या साता जन्माच्या आणाभाका

अहमदनगरच्या लग्नाची राज्यभर चर्चा; स्मशानात घेतल्या साता जन्माच्या आणाभाका

Ahmednagar Marriage : प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे लग्न. लग्न म्हंटले की मोठा गाजावाजा, थाट, मोठं मोठे लॉन्स, डीजे आकर्षक सजावट अशी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे पार पडलेल्या एका लग्नाची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. हा लग्नसोहळा मंगलकार्यालय किंवा लॉन्समध्ये नाही तर चक्क स्मशानभूमीमध्ये पार पडले आहे. ऐकून तुम्हाला देखील नवल वाटले असेल मात्र हे खरं आहे. स्मशानभूमीत गेल्या 20 वर्षापासून काम करणारे गंगाधर गायकवाड यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानभूमीतच लावला. जन्माला आल्यांनतर ज्या स्मशानभूमीत आयुष्याचा शेवट होतो तिथेच या जोडप्याने आपल्या सहजीवनाची सुरूवात केली आहे. ( Ahmednagar Marriage in Cemetery)

फडणवीस अन् शिंदेंचे विश्वासू सुषमा अंधारेंच्या रडारवर; मध्यान्ह भोजनाचा घोटाळा काढत म्हणाल्या…

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात राहणारे गंगाधर गायकवाड दाम्पत्य हे गेली अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत आहे. ते मसनजोगी करत आपला उदरनिर्वाह करत असायचे. आयुष्याचा शेवट ज्या स्मशानभूमीत होतो याच ठिकाणी काम करून त्यांनी आपल्या कुटुंबीयांची उपजीविका भागवली. विशेष म्हणजे त्यांच्या या कामामध्ये त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना मदत करत असायचे.

ज्ञानवापी मशिदीचं करण्यात येणारं ASI सर्वेक्षण काय आहे? जाणून घ्या…

गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करत असल्याने त्यांची मुले देखील याच ठिकाणी लहानाची मोठी झाली. यातच गायकवाड यांच्या मुलीचे लग्न करायचे ठरले. तर कोणतेही मंगल कार्यालय या लग्नसोहळ्याला न घेता त्यांनी आपल्या मुलीचे लग्न थेट स्मशानभूमीतच लावून देण्याचे ठरवले. गायकवाड व जयस्वाल कुटुंबाने वधू मयुरी व वर मनोज यांचा विवाह स्मशानभूमीत करण्याचे ठरवले. मयुरी व मनोज यांच्या विवाह सोहळ्यासाठी स्मशानभूमीतच मांडव टाकण्यात आला. सनई चौघाड्यांचा सुरात आणि शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

राहता येथील पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडांनी या मुलीचे कन्यादान करत त्यांना संसार उपयोगी भांडीही भेट दिली. अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थित राहत या अनोख्या लग्नात सहभाग घेतला. आजही आपल्या समाजात स्मशानभूमी या ठिकाणाला अशुभ मानले जात आहे. मात्र याच स्मशानभूमीत विवाहाचे सर्व संस्कार पार पडले. अगदी थाटामाटात दोघांचा विवाह लावण्यात आला. अंधश्रद्धेला फाटा देणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत केले. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मनोज-मयुरीची लव्हस्टोरी :
जिल्ह्यात मनोज व मयुरीच्या लग्नाची चर्चा जोरदार रंगली. मात्र या दोघांची लव्हस्टोरी देखील अशीच आगळीवेगळी आहे. मयुरी व मनोज या दोघांचे देखील बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. दरम्यान दोघेही शिर्डी येथील एका ठिकाणी कामास असल्याने त्यांची मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. याच नात्याला आयुष्यभर घेऊन जाण्यासाठी त्यांनी लग्नाचा विचार केला. कुटुंबीयांची परवानगी घेत हा लग्न सोहळा मोठ्या थाटात पार देखील पडला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube