Download App

Gulabrao Patil : विकेट जाण्याची चर्चा अन् पवारांसोबत प्रवास… राजधानी एक्सप्रेस मंत्रिपद वाचविणार?

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेची (Shivsena) मुलूख मैदानी तोफ गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे मंत्रिपद जाण्याची चर्चा आहे. शिंदे सरकारमधील (Shinde Government) 5 मंत्र्यांच्या कामाबद्दल भाजप हायकमांडमध्ये नाराजी असून त्यांचे राजीनामे घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे. या 5 मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील यांच्याही नावाचा समावेश असल्याचं सांगितलं जातं आहे. अशात गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं आहे. (NCP chief Sharad Pawar and minister Gulabrao Patil were seen traveling in the same train yesterday)

शरद पवार आणि गुलाबराव पाटील हे काल (15 जून) एकाच रेल्वेतून प्रवास करताना दिसून आले. मुंबईमधून दोन्ही नेते राजधानी एक्सप्रेसने जळगावला आले. शरद पवार हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणाऱ्या राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. काल (15 जून) दुपारी चार वाजता मुंबईतून राजधानी एक्सप्रेसने जळगावच्या दिशेने निघाले.

Eknath Shinde : शेतकरी कंपन्यांच्या इथेनॉल निर्मितीसाठी धोरण आणणार; ऊसतोड मजूरांवर अन्याय करणाऱ्यांची गय नाही

त्याचवेळी गुलाबराव पाटील हे देखील कॅबिनेटची बैठक आटोपून मुंबईतून राजधानी एक्सप्रेसने जळगावच्या दिशेने निघाले. दोन्ही नेत्यांची राजधानी एक्सप्रेसमध्ये भेट झाली. या दोन्ही बराच वेळ चर्चा झाली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय राजकीय चर्चा झाली याची माहिती मात्र समोर आलेली नाही.

दरम्यान, या भेटीबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, हा योगायोग होता, त्यांचा आणि माझा नंबर बाजू बाजूला होता. सहाजिक आहे प्रवास करण्याची संधी मिळाली. चर्चा करणं आलं, पाण्याचे विषय, कृषीचे विषय असतील यावर चर्चा झाली. आनंद वाटला. राजकीय चर्चा कोणतीही झाली नाही. त्यांनी जिल्ह्यातील कृषी परिस्थिती विषयी माहिती घेतली. तुमच्या कामाबद्दल काही मार्गदर्शन केलं का? यावर बोलताना ते म्हणाले, हे बघा चारवेळा मुख्यमंत्री राहिलेला माणूस आहे. कृषीमंत्री राहिलेला माणूस आहे. एका प्रमुख पक्षाचे नेते आहेत. ऐकणं आमचं काम आहे.

पीक विमा कंपनीकडून बळीराजाची थट्टा, नुकसान भरपाई म्हणून दिले फक्त 173 रुपये

शिंदे सरकारमधील 5 मंत्र्यांची गच्छंती होणार?

राज्यातील मंत्र्यांच्य कामकाजावर भाजपाची एक यंत्रणा सतत लक्ष ठेवून असते. या यंत्रणेमार्फतच भाजप हायकमांडकडे अहवाल पाठविला जातो. या अहवालामध्ये राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांच्या कामकाजाबाबत नकारात्मक उल्लेख आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना या पाच मंत्र्यांना वगळावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि अन्न औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे.

Tags

follow us