पीक विमा कंपनीकडून बळीराजाची थट्टा, नुकसान भरपाई म्हणून दिले फक्त 173 रुपये

पीक विमा कंपनीकडून बळीराजाची थट्टा, नुकसान भरपाई म्हणून दिले फक्त 173 रुपये

Distribution of crop insurance :गतवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी आणि पूर आला होता. त्यामुळं लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या पिकांचे पंचनामे सरकारने केले होते. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, या पीक विमा वितरण (Distribution of crop insurance) दरम्यान विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा विचित्र प्रकार समोर आला. एकाच गट क्रमांकाच्या दोन शेतकरी भावांचे सारखेच नुकसान झाले असतांना विमा कंपनीने एका भावाला 26,000 रुपये आणि दुसऱ्या भावाला केवळ 173 रुपये नुकसाई भरपाई दिली आहे. हा प्रकार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात घडला. मात्र, पीक विमा कंपनीच्या (Crop Insurance Company) या अजब वागणुकीबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Strange management of the company during distribution of crop insurance, 173 rupees paid as compensation)

https://www.youtube.com/watch?v=Yc2Q59LsL1s

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढा गावात राजू कदम आणि सुरेश कदम या भावांची एकमेकांच्या शेजारी शेती आहे. या दोन्ही भावांचा शेती गट क्रमांक एकच आहे. गतवर्षी या दोन्ही भावांनी आपापल्या शेतात एक हेक्टरमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील 43 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अर्धापूर तालुक्यातील कोंढासह अनेक गावांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला होता. यात कदम बंधूंचे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले होते. गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामेही प्रशासन व पीक विमा कंपनीकडून करण्यात आले. राजू कदम आणि सुरेश कदम या दोघांचं सारखचं नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली होती. पण, विमा कंपनीने सुरेश कदम यांना 26 हजार 254 रुपये तर राजू कदम यांना केवळ 173 रुपये नुकसान भरपाई देऊन थट्टा केली आहे. पीक विमा कंपनीच्या अजब कारभाराबाबत शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन यांचे भावी जीवनाचे सूरही जुळले… 

दरम्यान, पीक विमा कंपनीने पंचनामा करण्यासाठी खासगी एजन्सी नेमली होती. मात्र त्यांचे कर्मचारी बांधावर जाऊन पंचनामे करत नसल्याचा आरोपही तेव्हा शेतकऱ्यांनी केला होता. आता काहींना 382 रुपये, काहींना 1268 रुपये तर काहींच्या बँक खात्यात 1000 रुपयांच्या आत रक्कम जमा झाली. 382 रुपये प्रति एकर आणि 1268 रुपये प्रति हेक्टर देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना किमान 25 हजार रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र फारच थोड्या शेतकऱ्यांना समाधानकारक पीक विमा मिळाला आहे. विमा कंपनीचा हा अजब कारभार पाहून कृषी विभागाचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले असून कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारी विमा कंपनीकडे पाठवल्यात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube