Download App

ठाकरेंची नगर जिल्ह्यात ताकद वाढणार…; साजन पाचपुते ‘शिवबंधन’ बांधणार

Ahmednagar : आगामी निवडणुका पाहता राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. नुकतेच भाऊसाहेब वाकचौरे हे पुन्हा एकदा आपल्या स्वगृही म्हणजेच ठाकरे गटात परतले आहे. आता ठाकरे गटाची नगर जिल्ह्यात ताकद वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय छल्लारे यांच्यानंतर आता भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आणि काष्टीचे सरपंच साजन पाचपुते हे शिवबंधन बांधणार आहेत. येत्या 4 सप्टेंबर रोजी मुंबईत हा पक्षप्रवेश होणार आहे.

Eknath Shinde : तिघांचे वाद लवकरच बाहेर येणार; नाथाभाऊंचा दाव्याने खळबळ!

गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणात मोठे फेरबदल झाले. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर ठाकरे गट व शिंदे गट असे दोन गट शिवसेनेत निर्माण झाले. त्यापाठोपाठ आता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये देखील बंडाची ठिणगी पडली व या पक्षात देखील अजित पवार गट व शरद पवार गट तयार झाला. दरम्यान पक्षातील बंडानंतर पक्षातील नेते मंडळी देखील विभागले गेले. यातच आता आगामी काळात विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका या होणार आहे. निवडणुकांच्या अनुषंगाने आता पक्षांतराच्या घटना देखील वाढू लागल्या आहे.

गद्दारांचं सुलतानी संकट आसमानी संकटापेक्षा मोठं; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

ठाकरे गटाची जिल्ह्यात ताकद वाढतेय
शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरु झाले होते. मात्र आता ठाकरे गटात देखील नेत्यांचे इनकमिंग सुरु झाले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे गटात मातोश्री येथे प्रवेश केला.

आता त्यांच्या पाठोपाठ भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आणि काष्टीचे सरपंच साजन पाचपुते येत्या 4 सप्टेंबर रोजी ठाकरेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहे. याबाबत नगरमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी शशिकांत गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पुतण्याचा काकांना दणका
साजन पाचपुते हे भाजपचे आमदार असलेले बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत कौटुंबिक लढाई देखील समोर आली होती. या निवडणुकीत साजन विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली. विशेष म्हणजे या लढाईत साजन यांनी विजय मिळवत आपल्याच काकाला मोठा धक्का दिला होता.

Tags

follow us