गद्दारांचं सुलतानी संकट आसमानी संकटापेक्षा मोठं; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

गद्दारांचं सुलतानी संकट आसमानी संकटापेक्षा मोठं; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray On State Government : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (27 ऑगस्ट) हिंगोली येथील रामलीला मैदानावर सभा सुरु आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आले आहेत. जे जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं काम राज्यातील सरकार आणि दिल्लीत बसलेले यांचे मायबाप करत आले आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मोठी बातमी; सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला आग, 3 जणांचा मृत्यू

कांदा उत्पादक शेतकरी इथला विषय नसला तरी सरकारने मध्यस्थी केली पाहिजे. शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळत असतील तर ते देण्याचं काम सरकारने केले पाहिजे, त्याचवेळी ग्राहकांना योग्य भावामध्ये कांदा देण्याचे काम सरकारने केले पाहिजे, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

घरात बसणाऱ्यांना करंट देऊन लाईनवर आणलं, CM एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका

डबल इंजिन सरकार ट्रिपल इंजिन सरकार म्हटलं जातं, पण शेतकऱ्यांसाठी काय करताय? डबल इंजिन सरकार ट्रिपल इंजिन नुसत्या वाफा सोडतंय, हवेत थापांच्या वाफा सोडतंय, सरकार आपल्या दारी सरकार आपल्या दारी पण योजना फक्त कागदावरी असे म्हणत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, विशेष म्हणजे मला खरच दया येते देशभरामध्ये बाजारबुनग्यांचा कारभार चाललेला आहे, सरकार म्हणून मी मागे एका सभेमध्ये बोललो होतो की, आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, हिंदू आहोतच पण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आहे.

भाजपमध्ये जे चाललं आहे, ते म्हणजे राम श्रीराम, श्रीराम आता त्यांच्यामध्ये सगळे आहेत आायराम. पण मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते. भाजपमध्ये अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपलं आयुष्य भाजपसाठी आयुष्य झिजवलं. कधीतरी आपला भगवा फडकेल, पण भाजपचे कार्यकर्ते फक्त दांड्यापुरतेच राहिले आहेत. झेंडा दुसरेच फडकवत आहेत, असेही टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube