घरात बसणाऱ्यांना करंट देऊन लाईनवर आणलं, CM एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका

घरात बसणाऱ्यांना करंट देऊन लाईनवर आणलं, CM एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका

Cm Eknath Shinde : आम्ही घरात बसणाऱ्यांना करंट देऊन ऑनलाईनवरुन लाईनवर आणलं, असल्याची जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर(Udhav Thackeray) केली आहे. परभणीमध्ये आयोजित केलेल्या शासन आपल्या कार्यक्रमात मुख्यंमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विकासकामांबद्दल भाष्य करीत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

खळबळजनक! भाजप खासदाराच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला 10 वर्षीय मुलाचा मृतदेह

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सध्या देश कुठं चाललायं, पण काही लोकं घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन पद्धतीने पाहत होते, पण आम्ही एक करंट, झटका देऊन ऑनलाईनवरुन लाईनवर आणण्याचं काम केलं आहे, आम्ही फक्त विकासकामांनाच महत्व देत असल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेता टीका केली आहे.

‘भारतात बसून चांद्रयान चंद्रावर उतरु शकतं, मग ईव्हीएम मार्फत मतदान…’; आव्हाडांना शंका

तसेच मागील अडीच वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन ते अडीच कोटी रुपये खर्च झाले अन् आत्ता मागील एका वर्षात 100 कोटींचा आकडा आपण पार केल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच शासन आपल्या दारी कार्यक्रमातून अनेकांना लाभ मिळत आहे, म्हणूनच आम्हाला एक प्रकारचं समाधान मिळत आहे. आपले सर्व अधिकारी गावागावांत जाऊन नोंदणी करुन त्यांना लाभ देण्याचं काम करीत आहेत. त्या माध्यमातून जनता जनार्दनाचा लाभ मिळत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

‘नाना पटोले माझे मित्र, त्यांना मी माफ करतो’; जपानहून परतताच फडणवीस असं का म्हणाले?

दुसरीकडे आम्ही पाटणपासून शासन आपल्या दारी कार्यक्रमाला सुरुवात केली आहे, तर काही लोकं पटण्यामध्ये एकत्र आले आणि खिचडी सुरु झाली आहे पण त्यांना एकच सांगू इच्छितो, पण या देशाला पुढे जायचं असेल तर मोदींच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नसल्याचं ते म्हणाले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=MRAtdaSU8IE

दरम्यान, आज विकासाच्या मुद्द्यावर अजितदादा आमच्यासोबत आहेत, चांद्रयान 3 चं यशस्वी उड्डाण आणि लॅंडिगही झालं. दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश ठरल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली असून त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आल्याचं दिसून आलं होतं. आज हिंगोलीत उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा पार पडत आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठऱणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube