‘नाना पटोले माझे मित्र, त्यांना मी माफ करतो’; जपानहून परतताच फडणवीस असं का म्हणाले?

‘नाना पटोले माझे मित्र, त्यांना मी माफ करतो’; जपानहून परतताच फडणवीस असं का म्हणाले?

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या जपान दौऱ्यावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार टीका केली होती. राज्यात दृष्काळसदृश्य स्थिती आहे. शेतकरी, महिला, युवक यांचे कित्येक प्रश्न प्रलंबित आहे. आणि सरकारमधील मंत्री देश फिरताहेत, असं वक्तव्य पटोलेंनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा आता फडणवीसांनी समाचार घेतला आहे. मी पटोलेंना गांभीर्याने घेत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

आज जपान दौऱ्यावरून परतल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पटोलेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले. नाना पटोलेंच्या बोलण्याला मी महत्व देत नाही. त्यांना कधीच गांभिर्याने घेतलेलं नाही. नाना सकाळी सकाळी एक बोलतात, सायंकाळी दुसरं बोलतात. तर दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच बोलतात. मी जपानला गेलो तर भारतासाठी, मुंबईसाठी काहीतरी घेऊन आलो. मी तिकडे काही फिरायला गेलो नव्हतो. नाना पटोले महाराष्ट्रात कशाकरिता फिरतात आणि नेमकं काय करतात ते मला माहित आहे. ते माझे मित्र आहेत. ते काहीही बोलले तरी मी माफ करत असतो, असं फडणवीस म्हणाले.

पवार-आंबेडकर यांच्यातील राजकीय अढी सुटणार का? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले 

मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची प्रगती

चांद्रयान 3 च्या श्रेयवादाची लढाई आता पाहायला मिळते. या सगळ्याचं श्रेय भाजप मोदींना देत आहे, तर कॉंग्रेसजन हे नेहरूंच्या दूरदृष्टीमुळंच शक्य झालं आहे, असं सांगताहेत. यावरूनही फडणवीसांनी कॉंग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, कॉग्रेस काय म्हणतंय यावर मी बोलणार नाही. कारण कॉंग्रेस ही एक फ्रस्टेड पार्टी आहे. कॉंग्रेसने देशाबद्दल विचार करणं बंद केलं. आज पूर्ण देश जाणतो, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत मोठी प्रगती करत आहे. त्यादिवशी चांद्रयान लॅंड होत होतं, तेव्हा मोदी स्वत: दक्षिण आफ्रिकेमध्ये बसून मिनिट टू मिनिट याची माहिती घेत होते. आपल्या वैज्ञानिकांनी चांगल काम केंलं तर त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांतं कौतुक पंतप्रधान करणार नाही तर कोण करणार? देशाची जिथं सफल होतो, ते कॉंग्रेसला पटत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की, एवढ्या खालच्या स्तरावर राजकारण करण्यावरती विरोधी पक्ष उतरला आहे, असं फडणवीस म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube