Download App

भगवा वेश, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा… उद्धव ठाकरेंकडून काळाराम मंदिरात महाआरती

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray kalaram Mandir Aarati : अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजपवर टीका केली होती. हा भाजपच्या राजकीय प्रचाराचा भाग आहे, त्यामुळं या सोहळ्याला उपस्थित न राहण्याची भूमिका विरोधकांनी घेतली होती. तर ठाकरे गटाने काळाराम मंदिरात महाआरती करण्याचा निर्धार केला होता. दरम्यान, आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काळाराम मंदिरात (kalaram Mandir) महापूजा केली आहे.

रोहित शेट्टीने चेन्नई एक्सप्रेसबद्दल शाहरुख खानचा ‘तो’ किस्सा सांगितला; म्हणाला ‘लुंगी डान्स’ हे गाणे…’ 

आज उद्धव ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकच्या पंचवटी येथील काळा राम मंदिरात श्री रामाची महाआरती केली. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी यांनी यावेळी भगवा कुर्ता परिधान केला होता. तसंच गळ्यात रुद्राक्षाची जपमाळाही घातल्या होत्या आणि कपाळावर भगवा टिळा लावला होता. यावेळी काळाराम मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

“छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच पंतप्रधान मोदीही श्रीमंत योगी” : गोविंद देवगिरी महाराज 

महाआरती आधी उद्धव ठाकरेंनी भगूर येथे जाऊन स्वातंत्र्यसैनिक सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली आणि सावरकरांच्या पुतळ्याला नमन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, हॉटेल रॅडिसन ब्लू येथून उद्धव ठाकरे काळाराम मंदिराकडे रवाना झाल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे मुंबई नाक्यावर जंगी स्वागत केले. त्यांना जेसीबीद्वारे 40 फुटांचा हार घालण्यात आला. उद्धव ठाकरे काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यांनी पूर्वेमहाद्वारातून काळाराम मंदिरात प्रवेश केला. सर्व प्रथम त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी भगवान श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात आली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अयोध्येच्या राम मंदिरात आरती केली. तर उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाऊन आरती केली. यातून आपण अजूनही हिंदुत्व सोडलं नाही, असा संदेश देण्यचाा त्यांनी प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा सूर होण्यापूर्वी मंदिरात भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला. महापूजा आटोपल्यानंतर पुन्हा भाविकांना प्रवेश देण्यात आला. सुमारे अर्धा तास काळाराम मंदिर भाविकांसाठी बंद होते.

उद्या अधिवेशन
मंगळवारी (दि. 23) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून, त्यात दीड हजार शिवसैनिक सहभागी होणार आहेत. या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. ठरावांसोबतच काही महत्त्वाचे निर्णयही या अधिवेशनात घेतले जाणार आहेत.

follow us