Download App

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सांगण्यावरुनच जिल्हा बँकेने ‘श्री गणेश’ला कर्ज नाकारले

Shree Ganesh Cooperative Sugar Factory : सत्तेचा गैरवापर करुन श्री गणेश सहकारी साखर कारखाना हडप करण्याचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचा उद्योग सुरु आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सांगण्यावरुन जिल्हा बँकेने कर्ज नाकारले. त्यामुळे विखेंच्या दहशतीला सहकार विभागाने बळी पडू नये आणि गणेश कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी मागणी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

धनगर आरक्षणाप्रश्नी छ. संभाजीनगरमध्ये खलबतं, राम शिंदेंनी वेधलं सरकारचं लक्ष, मंत्री गिरीश महाजन लवकरच….

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे एका कार्यक्रमानिमित्त संगमनेरमध्ये गेले होते. त्यावेळी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच श्री गणेशचे उपाध्यक्ष विजय दंडवते, डॉ. एकनाथ गोंदकर, बाबासाहेब डांगे, संपत हिंगे, गंगाधर डांगे, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके आदी उपस्थित होते.

Devendra Fadanvis : मराठवाड्यात सात वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीचे फडणवीसांनी दिले ‘फुलप्रुफ’ उत्तर

यावेळी दंडवते म्हणाले की, श्री गणेश सहकारी साखर कारखाना वाचवण्याच्या हेतूने आता प्रयत्न सुरु आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील श्री गणेश कारखाना सुरु करण्यासाठी आम्ही पाठीशी उभा राहू, असा शब्द निवडणुकीनंतर दिला होता. मात्र तो शब्द फिरवून श्री गणेशच्या मार्गामध्ये अडचणी निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडून सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणाला जिल्हा बँकेने मंजुरी दिली. त्यानंतर डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याने बँकेला पत्र देऊन श्री गणेश कारखान्याला कर्ज देऊ नये, असेही सांगितले. गणेश कारखान्यातून अवाच्या सव्वा रकमेची मागणी केली.

नुकतेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्याने गणेश कारखान्याला पत्र देऊन 50 कोटी रुपये घेणे असल्याचे सांगितले. गणेश कारखान्याला कर्ज मिळू नये, यासाठी चाललेला आटापिटा आहे, असेही ते म्हणाले.

नगर जिल्हा बँकेने श्री गणेश कारखान्याला कर्ज मंजूर केले. त्यानंतर दुसरीकडे अटींचा खोडा घातला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचा हेतू स्पष्ट दिसून येत आहे. हे सर्व कोणाच्या सांगण्यावरुन सुरु आहे, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही, असा आरोप डॉ. एकनाथ गोंदकर यांनी केला आहे.

Tags

follow us