Devendra Fadanvis : मराठवाड्यात सात वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीचे फडणवीसांनी दिले ‘फुलप्रुफ’ उत्तर
Devendra Fadanvis : मराठावाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. आज (16 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या बैठकीचे ‘फुलप्रुफ’ उत्तर दिले आहे.
आम्ही पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबलो नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
फडणवीसांनी दिले ‘फुलप्रुफ’ उत्तर…
आता बेकायदेशीर मुख्यमंत्री श्रीमान मिंधे तेच करतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2016 मध्ये त्यांनी संभाजीनगरात मंत्रिमंडळात बैठक घेऊन साधारण 50 हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांचं काय झालं, असा सवाल ठाकरे गटाने केला होता. त्यावर फडणवीस यांनी विरोधकांना आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या बैठकीचे ‘फुलप्रुफ’ उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या एन्ट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप
यावेळी फडणवीस म्हणाले की, 4 ऑक्टोबर 2026 मध्ये जी बैठक झाली होती. त्यामध्ये एकुण 31 निर्णय घेण्यात आले होते. 22 विषय अवगत करण्यात आले होते. काही विषयांवर निर्देश देण्यात आले होते. या 31 विषयांचा आढावा 20217 ला घेण्यात आला त्यावेळी 10 विषयांवरील कारवाई पूर्ण झाले होते. 15 विषयांवर कारवाई टप्प्यात होती. 6 विषयांवरील कारवाई ही अपूर्ण होती.
बोलघेवड्या शिंदे-फडणवीसांपेक्षा ‘मविआ’च बेस्ट; पटोलेंचा पुरावा देत हल्लाबोल
आज 2023 चा विचार केला तर त्या 31 पैकी 23 विषय पूर्ण झाले आहेत. 7 विषय हे प्रगतिपथावर आहेत. 1 विषय हा उद्धव ठाकरेंच्या काळात व्यपगत झालेला आहे. विशेषतः यासंदर्भात सांगायचं झालं तर निम्न दुधना प्रकल्पाला 2,342 कोटींची सुप्रमा दिली होती. त्यावर आता 2,542 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.
तर 16, 964 हेक्टर सिंचन क्षेमता तयार झाली आहे. 434 हेक्टरचं भूसंपादन पूर्ण करण्यात आलं आहे. लाभाक क्षेत्रामध्ये 30 पैकी 23 हजार हेक्टरच काम पूर्ण करण्यात आलं आहे. त्यात 4 उपसा सिंचन योजनाही मंजूर करण्यात सुरू करण्यात आहेत. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प ज्याला 2,342 कोटींची सुप्रमा दिली होती. त्यात 2164 कोटी खर्च करण्यात आले आहेत. अशा अनेक कामांची यादी यावेळी फडणवीसांनी वाचून दाखवत 2016 ला घेतलेल्या बैठकीतील बहुतांश निर्णयांची अंमलबजावणी झाली होती. असं त्यांनी यावेली विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.