Download App

अनुराधा नागवडेंचा अजितदादांना धक्का; मशाल चिन्हावर मविआच्या उमेदवार?

श्रीगोंदा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून नागवडेंना उमेदवारी जाहीर होणार असल्याचं मानलं जात असून अनुराधा नागवडे मशाल चिन्हावर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

Anuradha Nagawade News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठे उलटफेर होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच श्रीगोंदा मतदारसंघात (Shrigonda Constituency) भाजपकडून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते (Pratibha Pachpute) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं. त्यानंतर अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांनी अजितदादांना धक्का देत ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आज श्रीगोंदा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून नागवडेंना उमेदवारी जाहीर होणार असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे आता अनुराधा नागवडे मशाल चिन्हावर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

यादी नाही थेट शरद पवारांकडून एबी फॉर्मचं वाटप, पारनेरमध्ये शिवसेनेला धक्का देत राणी लंकेंना संधी

नागवडे कुटुंब हे श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक राजकीय वर्चस्व असलेलं कुटुंब मानले जाते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र महायुती मधून श्रीगोंदाची जागा ही भारतीय जनता पक्षाला दिली गेल्याने अनुराधा नागवडे यांच्या उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

Stock Market : शेअर बाजाराची किरकोळ वाढीसह सुरूवात; बँकिंग आणि आयटी क्षेत्रात खरेदीचा कल

नुकतेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत मते आजमावली होती. यामधून कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी केली पाहिजे आणि निवडणूक लढवली पाहिजे असा कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता. यादरम्यान राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी मागणी केली होती. यामध्ये आता श्रीगोंद्याची जागा शिवसेनेला देण्यात येण्याचे एकंदरीत दिसून येत असून मशाल चिन्हावर अनुराधा नागवडे या भाजपाच्या प्रतिभा पाचपुते यांच्यासमोर उमेदवारी करतील असे एकंदरीत चित्र आहे.

Emerging Asia Cup 2024 मध्ये भारताने UAE चा सात विकेटने उडवला धुव्वा, अभिषेक शर्मा ठरला हिरो!

दरम्यान, एकूणच दोन महिलांमध्ये होणारी ही निवडणूक मोठी आव्हानात्मक आणि राज्यात लक्षवेधी ठरेल अशीच चिन्ह आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले माजी आमदार राहुल जगताप हे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.

follow us