ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. हल्ल्यात त्यांना तीन तरुणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली, त्यामुळे हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींनी अटक केली आहे.
घटना घडल्यानंतर पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना अटक केली आहे. टपरी हटवण्याबाबत महापालिकेत अर्ज दाखल केल्याप्रकरणी हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
Rohit Pawar : ‘भाजपाने खोटं बोलणं थांबवाव नाहीतर’.. ‘टोल’वादात रोहित पवारांची उडी
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी चैतन्य सुनिल सुडके याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगितलं की अक्षय विष्णू सब्बन याची टपरी सिताराम सारडा विद्यालयाजवळ असून ती हटवण्याबाबत हेरंब कुलकर्णी यांनी महापालिकेत तक्रार अर्ज दिला होता. याचाच राग मनात धरुन अक्षय सब्बन याच्या सांगण्यावरुन चैतन्य सुडके, अक्षय, सनी जगधने, एका अल्पवयीन मुलाने कुलकर्णी यांना मारहाण केली. आरोपींवर कलम 307,324,341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करुन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
इस्रायलमध्ये अडकेलली अभिनेत्री नुसरत भरुचा भारतात कशी परतली ?
नेमकं काय घडलं?
आजारी असल्याने शनिवारी दुपारी शाळेतून सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवरुन ते घरी येत होते. त्यावेळी अहमदनगरमधील रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली. लोखंडी रॉडने दोन्ही पायावर, दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला इजा झाली असून 4 टाके पडले.डोक्यावरचा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले. अन्यथा डोक्यावर जबर मार बसल्याने ते रस्त्यावर पडले. हल्ल्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटलला उपचार घेतले त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हेरंब कुलकर्णी यांनी शाळेजवळ असलेली अतिक्रमणे काढण्यात यावी, यासाठी महापालिकेला पत्र दिले होते. हेरंब कुलकर्णी यांच्या पत्रानंतर महापालिकेने सदरील अतिक्रमणे तातडीने हटवली होती. त्यावरुन हा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.