Download App

”निवडणुकांच्या निकालामुळं राऊतांच्या मनावर मोठा परिणाम, त्यांना सावरण्याचं बळ…”

  • Written By: Last Updated:

अहमदनगर – चार राज्यांच्या विधानसभांचे निवडणुकीचे निकाल समोर आले असून यामध्ये भाजपची तीन ठिकाणी विजयाकडे वाटचाल आहे. तर काँग्रेसला केवळ एकच ठिकाणी समाधान मानावे लागले. दरम्यान निकालापूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम चा प्रश्न उपस्थित केला. यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी उत्तर दिले. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मनावरती आधीच परिणाम झालेला आहे. आता निकाल पाहिल्यामुळे अजून मोठं दुःख झालेलं. आहे या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना अशा शब्दात खासदार विखेंनी खासदार राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

कर्नाटक गमावलं, तेलंगणाने नाकारलं; ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम अजूनही भाजपच्या टप्प्याबाहेरच 

देशात चार राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले. असून यामध्ये तीन राज्यांमध्ये भाजपाने विजयी मुसंडी मारली आली. केवळ एकाच राज्यात राज्यात काँग्रेसला यश मिळवता आले आहे. या निकालावरती नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार यापेक्षा अधिक चांगली कामगिरी निवडणुकांमध्ये करून दाखवणार. कारण निवडणुकीचे निकाल पाहता जनतेचा मोदींवरती विश्वास हेच या निकालातून दिसून येत आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नव्हती, त्या राज्यात भाजप आघाजीवर असल्याचं चित्र आहे.

Rajasthan : गेहलोतांची जादू पडली फिकी; रणथंबोर काबीज करणाऱ्या भाजपच्या विजयाची 5 कारणं 

विखे म्हणाले, ज्या राज्यात सिंगल इंजिन होतं, त्या ठिकाणी देखील आम्ही निवडून आलो. तर ज्या ज्या ठिकाणी डबल इंजिन आहे. त्या ठिकाणी कशी परिस्थिती असेल याचा अंदाज कोणी लावू शकत नाही…. निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेला विजय हे प्रत्येक अहंकारी माणसाला उत्तर आहे. जे गेल्या कित्येक दिवसांपासून टीव्ही समोर येऊन भाजपवर पैशांचे आरोप करत होते, त्यांना जनतेननं उत्तर दिलं आहे. राजकारणात कोणत्याही आरोपाला जनता ही उत्तर देत असते हेच या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट झाले असं विखे म्हणाले.

जनतेने या सगळ्या लोकांना या निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर दिले. 2024 ला साडेतीनशे पेक्षा जास्त बहुमताने NDAच्या जागा निवडून येतील आणि भाजप सरकार स्थापन करेल. पुन्हा मोदीच पंतप्रधान पदाची शपथ घेतील, असं विखे म्हणाले.

Tags

follow us