Sushma Andhare News : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज अहमदनगर दौऱ्यावर होत्या. अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुषमा अंधारे बार असोशिएशनच्या वकीलांशी संवाद साधणार होत्या. मात्र, अचानक हिंदु देव-देवतांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाच्या नेत्या स्मित अष्टेकर आणि मनसेच्या नेत्या अनिता दिघे यांनी कडाडून विरोध दर्शवत हायहोल्टेज ड्रामा केला आहे. पोलिस बंदोबस्त असतानाही अष्टेकर यांनी कार्यक्रमाला विरोध दर्शवला. अखेर सुषमा अंधारे यांनी कार्यक्रम यशस्वी करुनच दाखवला आहे. गदारोळ झाल्यानंतर बार रुमध्ये त्यांनी वकिल बांधवांशी संवाद साधला आहे.
Radhika Apte: राधिका आपटेचा टॉलिवूडचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यानी केलं ट्रोल
यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, हा संवाद राजकीय नाही. निवडणुक नाही प्रचारही नाही. मी वकिलांची व्यवसाय बंधू असून मला कोणी अडवू शकत नाही. मी तुमची बहीण सहकारी म्हणून आहे. डॉक्टर, इंजिनिअर, कवी, मेडिकल विद्यार्थी, असंघटीत मजूर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका अशा लोकांना मी भेटत आहे. राज्यासाठी एक पॉलिसी कागदपत्रे तयार झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही माहिती घेत होतो तेव्हा राहुरी वकील दाम्पत्यांची हत्या झाल्याचं समजलं. बार असोशिएशन आपण प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी चालवतो चर्चेदरम्यान लक्षात आलं की एकदा वकीलाची सनद नोंदवतो पण दर पाच वर्षांनी पुन्हा नोंदणी करा त्याची गरज काय नाही. त्यासाठी 250 आकारले जात आहेत, सर्व राज्यातील वकीलांच्या पैशांचा विचार केला तर ती रक्कम मोठी होते. त्यासाठी काम करायचं असून मी मंत्री, आमदार, खासदार, सरपंच, नाही पण एवढी ताकद आहे की भविष्यात मला अधिवेशनात तारांकित प्रश्न करायचा असेल तर माझ्यासाठी वकिलांच्या प्रश्न असतील, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
Ramdas Kadam : …तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासावीत; रामदास कदमांचं थेट आव्हान
ठाकरे गटाच्यावतीने सध्या सुषमा अंधारे यांचा मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्तसंवाद सुरु आहे. अशातच आज त्यांनी अहमदनगरमधील दुध उत्पादक, शेतकरी त्यानंतर जिल्हा न्यायालयातील बार रुमध्ये वकील बांधवांची भेट घेतली आहे. त्यांच्यासमवेत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर तसेच नगरसेवक व पदाधिकारी होते.
या कार्यक्रमास विरोध करणार असल्याची कल्पना ठाकरे गटाच्या स्मिता अष्टेकर यांनी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना दिली होती. त्यानंतर मनसेच्या अनिता दिघे यांनी सांगितलं की, या कार्यक्रमासाठी कुठल्याही स्वरुपात परवानगी घेण्यात आलेली नव्हती. सुषमा अंधारे कुठलीही पूर्वकल्पना न देता बार रुममध्ये आलेल्या आहेत. राजकीय व्यक्तींचं बारमध्ये काम नाही. त्यांनी हिंदु देवदेवतांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांना ठोकणारच असल्याचा थेट इशारा स्मित अष्टेकर यांनी दिला आहे.
दरम्यान, जिल्हा न्यायालयात अष्टेकर व दिघे यांच्या विरोधामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी त्यांना बाररूममध्ये जाण्यापासून अडवले. त्यानंतर पोलीस संरक्षणात कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी मनसेच्या काहीजण राजकीय अभिनवेश दाखवत राजकीय स्टंट करत होते, त्या शिळ्या कढीला ऊत आणत आहेत, असा आरोप केला.