Chagan Bhujbal : पुण्यात आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठण उपक्रम पार पडला. या उपक्रमात हजारो महिलांनी अथर्वशीर्षाचं पठण केलं. या उपक्रमावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी खंत व्यक्त केली आहे. महिलांनी अथर्वशीर्ष म्हटलं पण महिलांना भिडेवाड्यात जावसं वाटलं नाही, नतमस्तक व्हावं असं वाटलं नाही, ज्यांच्यामुळे मुली, महिला शिकल्या त्यांचा विसर त्यांना पडला, अशी खंत छगन भुजबळ(Chagab Bhujbal) यांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.
वाद पुन्हा उफाळणार! ‘भावी मुख्यमंत्र्यांचं पेवचं फुटलंय’; राम शिंदेंची खरमरीत टीका
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, दलित समाज अंधश्रद्धा आणि कर्मकांडापासून बाहेर आला आहे. ब्राह्मण समाजाला कर्मकांड माहित आहे, त्यांची वेगळी पद्धत आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांडामध्ये जर कुणी गुंतलं असेल तर तो ओबीसी समाज आहे. मी पेपरमध्ये वाचलं. 25 हजार महिला अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी जमल्या होत्या. मी नेहमी म्हणतो त्याच रस्त्याच्या पलिकडे भिडेवाडा आहे.
आधी मुलगा आता वडील भाजपमध्ये, शेळके कुटुंब फुटले; बाळासाहेब थोरातांना धक्का
तिथे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सुरु केलेली शाळा आहे. पहिली मुलींची शाळा तिथे आहे. अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या महिलांपैकी कुणीही तिथे जाऊन नतमस्तक होताना दिसलं नाही. सगळे विसरले, कर्मकांड मात्र अजूनही सुरु असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
नगर-कल्याण महामार्गावर भरधाव कारने पाच शेतमुजरांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी
यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमावरुन टीका केली आहे. ते म्हणाले, बागेश्वर बाबाच्या प्रवचनाला 5 लाख लोकं गेले, मला हे ऐकून आश्चर्य वाटलं, मी अशी माणसं पाहिलीत, ज्यांनी माईंड रिडिंग येतं ते असे खेळ करतात ते करुन दाखवल्यावर लाखो लोक त्यांच्या मागे जात असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
दरम्यान, अंधश्रद्धेच्या विरोधात लढणाऱ्या नरेंद्र दाभोलकर यांना जीव गमवावा लागला. गोविंद पानसरेंची हत्या झाली, गौरी लंकेश यांची हत्या झाली. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आणला, मात्र त्या कायद्याचाही काही उपयोग होत नसल्याचं ते म्हणाले आहेत.