वाद पुन्हा उफाळणार! ‘भावी मुख्यमंत्र्यांचं पेवचं फुटलंय’; राम शिंदेंची खरमरीत टीका

वाद पुन्हा उफाळणार! ‘भावी मुख्यमंत्र्यांचं पेवचं फुटलंय’; राम शिंदेंची खरमरीत टीका

Mla Ram Shinde : राज्यात भावी मुख्यमंत्र्यांचं पेवच फुटलंय, अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार राम शिंदे(Ram Shinde) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्यावर केली आहे. दरम्यान, वाढदिवसानिमित्त रोहित पवार यांच्या समर्थकांनी पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असं शीर्षक देऊन बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीवरुन राम शिंदे(Ram Shinde) यांनी रोहित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राम शिंदेंच्या(Ram Shinde) या टीकेनंतर आता पुन्हा एकदा शिंदे-पवार यांच्यात वाकयुद्ध पेटणार असल्याची शक्यता आहे.

दादांना जयंत पाटलांच्या शुभेच्छा! अजितदादा गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा…

पुढे बोलताना ते म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी सहा वर्षांपूर्वी बारामतीमधील शिरसूळ जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीकडे तिकीट मागितलं होतं. त्यानंतर रोहित पवार यांना तिकीट न देण्याचं राष्ट्रवादीत अंतर्गत ठरलं,त्याचवेळी रोहित पवार यांनी जर मला तिकीट मिळालं नाहीतर मी भाजपमध्ये जाईल, अशी अलिखित, अप्रत्यक्षपणे धमकी दिली असल्याचा गौप्यस्फोटही राम शिंदे यांनी यावेळी केला आहे.

Kiran Mane Post: ‘अखेर स्वप्न सत्यात उतरलं.. ‘,किरण माने यांनी खरेदी केली आलिशान कार

तसेच रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेसाठी ब्लॅकमेल करुन शरद पवार साहेबांचा आदेश, संदेश आणि विचारांना 2017 सालीच हरताल फासला होता, त्यांच्या मनात एक आणि ओठात एक हे काही आता झाकून राहिलेलं नाही, त्यामुळे रोहित पवार यांची स्वार्थी प्रवृत्ती वाढत चालल्याची टीकाही राम शिंदे यांनी यावेळी केली आहे.

अहमदनगरमधील जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांनी बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये आमदार रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या बॅनरची राज्यभरात चर्चा सुरु झाली आहे.

पंकजा मुंडेंना मोठा धक्का, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटीचा छापा, 19 कोटींची मालमत्ता जप्त

आमदार रोहित पवार यांचे बॅनरच फक्त अहमदनगरमध्येच नाहीतर पुण्यात झळकल्याचं दिसून आले आहेत. पुण्यातील मावळमधील टोलनाक्यावरही रोहित पवारांचे असे बॅनर लागले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसर अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो.

पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या १५० जागांसाठी भरती

मात्र, सध्या पिंपरी-चिंचवड शहरात आमदार रोहित पवारांनी लक्ष घातलं असून, दौरे करायला सुरुवात केलीय. आमदार रोहित पवारांचा 29 सप्टेंबरला वाढदिवस असल्यामुळं मावळातील उर्से टोलनाक्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावले आहे.

दरम्यान, राम शिंदे रोहित पवार यांच्यावर टीका करण्याची कोणतीही सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे. राम शिंदे यांनी केलेल्या टीकेवरुन अद्याप रोहित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून रोहित पवार यावर काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube