नगर-कल्याण महामार्गावर भरधाव कारने पाच शेतमुजरांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू, २ गंभीर जखमी
पुणे : गेल्या काही दिवसांपासून कल्याण-नगर महामार्गावर (Kalyan-Nagar highway) सातत्याने अपघात होत आहे. आताही नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे परिसरातील दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलाजवळ भरधाव कारने पाच परप्रांतीय मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Pune Accident) या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांढरे, दिनेश तरोळे अशी मृत तिघांची नावे आहेत. रविवारी रात्री 8 ते 8.30 च्या सुमारास हा अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींवर सध्या आळेफाटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ते एका शेतकऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करण्यासाठी आले होते, अशी माहिती आहे.
आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच नाही! शिंदे गटाच्या आमदाराला विश्वास…
या संदर्भात अधिक माहिती अशी की, दोन-तीन दिवसांपूर्वी नगर-कल्याण महामार्गावर मध्य प्रदेशातून पाच शेतमजूर दिघोर परिसरात आले होते. मात्र, रविवारी सायंकाळी शेतीचे काम आटोपून पायी घरी जात असताना महामार्वरून जाणाऱ्या चारचाकी क्र. MH12VQ8909 ही भरधाव वेगात होती. त्या कारने या पाच मजुरांना चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी ल वाहतूक मोकळी करूनपुढील कारवाई करत त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.
गेल्या चार-पाच दिवसांत नगर-कल्याण महामार्गावर वारंवार अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे.गेल्याच आठवड्यात या महामार्गावर अपघात होऊन दोघे जण मृत्यूमुखी पडली होते. ही घटना ताजी असतांनाच काल पुन्हा भीषण अपघात झाला. अशा परिस्थितीत हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की, काय अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळं प्रशासनाकडून गावागावात गतिरोधक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.