नाशिक : आज संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या सभेच्या तयारीसाठी मालेगावात आले होते. तेव्हा त्यांनी तेथील शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यावर सडकून टीका केली. ही सभा नसून जाहीरसभेच्या तयारीसाठी आम्ही येथे आलोय. जो उत्साह आज दिसतोय त्यावरून असे जाणवते कि इथल्या आमदाराला पाडण्याची गरज नाही तो पडल्याचं आहे. उद्धव ठाकरे इकडे या आमदाराला पाडण्यासाठी नाहीतर कायमचा गाडण्यासाठी येत आहेत. अशी टीका यावेळी खासदार संजय राऊत यांनी दादा भुसेंवरती केली.
मालेगावचे हिंदू मुस्लिम वातावरण खराब करून निवडणूक जिकंण्याचं ष्टयंत्र रचलं जत आहे. परंतु आपल्याला हे वातावरण खराव होऊ न देता मालेगावात आपल्याला नाव इतिहास घडवायचा आहे. त्यासाठीच महाराष्ट्राला संदेश देण्यासाठी उद्धव ठाकरे मालेगावात येणार आहेत. यावेळी त्यांनी भाऊसाहेब हिरेंच कौतुक केलं त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा त्याग केला होता पण माघार घेतली नाही. हिरे जिथे जातात त्यांना सत्ता मिळते त्यामुळे आता महाराष्ट्रात आम्हाला सत्ता मिळणार आहे. महाराष्ट्रात आज ज्या चाळीस गद्दारांनी सत्तेसाठी महाराष्ट्र विकला त्यांना याच मालेगावातून संदेश देण्यासाठी हि हीरांची भूमी निवडली आहे.
नास्तिकांचा मेळावा रविवारी पुण्यात भरणार? कोणकोण जाणार?
यावेळी संजय राऊत यांनी दादा भुसे यांचा आगामी प्रतिस्पर्धक अद्वैद हिरे याचे देखील कौतुक केले. यावेळी संजय राऊत म्हणाले मला मालेगावची सभा कशी होईल याची चिंता नाही. कारण हिरे ही सभा गाजवणाराच आहेत. आणि त्यांना उद्धव ठाकरेंची आणि शिवसेनेची मोठी साथ देखील आहे. हिरे यांनी नुसतं मालेगावचा नाही तर पूर्ण उत्तर महाराष्ट्र ओळखतो. त्यांहूले आम्हाला खात्री आहे कि आगामी निवडणुकीत हिरे हे येथील आमदाराचा प्रभाव करून त्याला उताणा करणार आहेत.