Rain Update: नगर, पुणे, नाशिकला अवकाळी, गारपीटीचा तडाखा; पिके भुईसपाट !

Unseasonal Rain: राज्यातील अनेक भागाला रविवारी अवकाळी (Unseasonal Rain) पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अनेक भागात गारपीट झाली आहे. त्यामुळे पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे, नाशिक, नगर, सातारा या जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. हवामाने विभागाने राज्यातील काही भागात मुसळधार पावसाबरोबर गारपिटीचा अंदाज दिला होता. रविवारी दुपारनंतर जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली […]

Ahmednagar News : पाऊस आला अन् घरी जायच्या आत आमचा...; विखे पाटलांसमोर शेतकऱ्याची व्यथा

Ahmednagar News

Unseasonal Rain: राज्यातील अनेक भागाला रविवारी अवकाळी (Unseasonal Rain) पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अनेक भागात गारपीट झाली आहे. त्यामुळे पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे, नाशिक, नगर, सातारा या जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला आहे.

हवामाने विभागाने राज्यातील काही भागात मुसळधार पावसाबरोबर गारपिटीचा अंदाज दिला होता. रविवारी दुपारनंतर जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस कोसळला आहे. पावसाबरोबर गारपीटही झाली आहे. त्यामुळे भाजीपाला, फळबागा व सध्या लावलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने नगर जिल्ह्याला झोडपलं, पारनेरमध्ये गारपीट

रविवारी नगर शहरासह पारनेरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. पारनेरमध्ये तर जोरदार गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे बळी राजा अवकाळी पावसामुळे मोठा संकटात सापडला आहे. नगर शहरात देखील रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली.

ना बारामती, ना माढा! संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभा लढवायला आवडेल; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

यंदा कमी पाऊस पडला आहे. पिके घेता न आल्याने बळीराजा चिंताग्रस्त होता. दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतामधील झालेली पिके व गारपिटीने पुन्हा एकदा जमीनदोस्त झाली आहे.

जोरदार वाऱ्यासह विजेचा कडकडाट

नगर शहरात सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली. जोरदार वाऱ्यासह विजादेखील कडाडल्या. नागरिकांनी स्वतःचे सुरक्षिततेची काळजी घ्यावी मदतीसाठी आपत्कालीन नंबरला कॉल करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये द्राक्षांचा बागांना फटका

नाशिकमधील चांदवड, निफाड, येवला, सिन्नर या तालुक्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे द्राक्ष, डाळिंब, पपई, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा हंगाम काहीच दिवसांवर आला होता. त्यामुळे काढणीला आलेले द्राक्षांचा बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

शरद पवारांचे पुन्हा पावसात भाषण ! धैर्याने पुढे जायचा सल्लाही


पुणे शहरात वीजपुरवठा खंडित

पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. तर पुण्यातील ग्रामीण भागामध्ये गारपीट झाली आहे. आंबेगाव तालुक्यात गारपीट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रानंतर विदर्भातही गारपीटीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Exit mobile version