Download App

शिर्डी लोकसभेसाठी उत्कर्षा रुपवतेंनी फुंकले रणशिंग…

Utkarsha Rupwate : येत्या काळात लोकसभा निवडणुका ( Lok Sabha Election 2024)असल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच शिर्डी लोकसभा निवडणूक (Shirdi Lok Sabha)यंदा चांगलीच गाजणार असे दिसत आहे. अनेक राजकीय पक्षांकडून याठिकाणी मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. यातच काँग्रेसचे एक दमदार व अभ्यासू असा चेहरा या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women)सदस्य असलेल्या उत्कर्षा रुपवते Utkarsha Rupwateशिर्डी लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मोठा राजकीय वारसा लाभलेल्या उत्कर्षा रुपवते यांची जनसामान्यांमध्ये चांगलीच पकड आहे. विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसची नाळ जनसामान्यांशी जोडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या रुपवते घराण्यातील उत्कर्षा रुपवते यांनी शिर्डीच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा संपूर्ण परिचय व त्यांची राजकीय कारकीर्द आपण जाणून घेऊया

001


Harshwardhan Patil यांना इंदापूरमध्ये फिरू न देण्याची धमकी? पत्र लिहित घेतली शिंदे-फडणवीसांकडे धाव

उत्कर्षा रुपवते यांचा परिचय
शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव असून, या मतदारसंघातून रुपवते या निडवणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तत्पूर्वी उच्चशिक्षित असलेल्या रुपवते या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. युवक काँग्रेसमध्येही त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक विभागांचे नेतृत्व केलेले तसेच माजी शिक्षणमंत्री, वित्तमंत्री व विधानसभेचे अध्यक्ष म्हणून ठसा उमठवणारे मधुकरराव चौधरी (Madhukarrao Chaudhary)हे उत्कर्षा यांचे आजोबा आहेत. तसेच माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या त्या नात आणि प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते प्रेमानंद रुपवते यांच्या त्या कन्या आहेत. कुटुंबातूनच मोठा राजकीय वारसा लाभलेल्या उत्कर्षा या सध्या दादासाहेब यांनी स्थापन केलेल्या बहुजन शिक्षण संघ या संस्थेचा कारभार पाहतात.

02

रुपवते यांची कारकीर्द
उत्कर्षा रुपवते यांनी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव म्हणून तीन वर्षे काम केलेले आहे. 2011 पासून शिर्डी लोकसभा मतदार संघाचे युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. त्या 2007 पासून पक्षाच्या सक्रिय सभासद आहेत. तसेच माजी समाज कल्याणमंत्री दादासाहेब रुपवते यांचा आंबेडकरी वारसा आदी विचारांचा प्रभाव व संस्कार त्यांच्यावर आहे. त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य असून त्यांनी युवा संघटन चांगले केले आहे. तसेच काँग्रेसच्या प्रभारी म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्या कामाचा ठसा उमठवला आहे. दीव, गुजरात, दिल्ली, गोवा, दादरा-नगर हवेली या राज्यांमध्ये काम करुन पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

04

जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व
विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांची लोकसभा अमेठीमध्ये रुपवते यांनी 15 दिवसांपेक्षा जास्त काम केले. युवक काँग्रेससाठी संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी सक्रिय काम केले. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांसाठी कामे केली. शिर्डी लोकसभा क्षेत्रात “चलो पंचायत अभियान” हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जनतेच्या समस्यांसाठी पायाला भिंगरी लावत त्या आज मतदार संघात फिरत आहेत. राज्य महिला आयोगाच्या सदस्य असल्यामुळे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या तालुकानिहाय भेटीगाठी सुरु असतात. महिलांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्या शहर गाव-खेडे-वाड्या-वस्त्यांवर जाऊन महिलांच्या समस्या जाणून, त्या सरकार दरबारी मांडून त्या महिलांना न्याय देण्याचे काम करत आहेत. जनतेच्या न्यायासाठी हक्कासाठी आज आंदोलने, मोर्चे करत जनतेच्या समस्या त्या सोडवण्यासाठी अग्रस्थानी असतात.

03


लोकसभेसाठी प्रबळ दावेदार
राज्य महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या उत्कर्षा रुपवते यांच्या नावाची चर्चा सध्या शिर्डी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून होत आहे. खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचे काम मोठ्या तळमळीने त्यांनी केले आहे. रुपवते परिवार नेहमी अखिल भारतीय कॉंग्रेसशी निष्ठावंत असा आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उत्कर्षा रुपवते या प्रबळ उमेदवार म्हणून आता चर्चेत आहे. प्रस्थापित व पक्षातून स्थलांतर करुन आलेल्या उमेदवारांपेक्षा युवा, होतकरु उमेदवार असलेल्यांना संधी मिळावी अशी जनतेची भावना आहे. त्यामुळे उत्कर्षा रुपवते यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.

follow us