Maharashtra MLC Election 2024 : विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये चांगली चुरस पाहायला (Maharashtra MLC Election 2024) मिळाली. निवडणुकीत महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले तर शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना (Jayant Patil) पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत काँग्रेसची आठ (Congress Party) मतं फुटल्याची चर्चा रंगली आहे. यावरून आता वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी (Utkarsha Rupwate) काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नेहमीप्रमाणे गुप्त मतदानात काँग्रेसची मतं फुटली. इतरांना B टीम म्हणून बदनाम करणारे स्वतःच भाजपाची A टीम निघाले, असा अशी टीका रूपवते यांनी केली.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता असताना ऐनवेळी आणखी एका उमेदवाराच्या उमेदवारीने या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली. या निवडणुकीत मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता आधीच वर्तवली जात होती. महायुतीचे सर्वच उमेदवार कसे निवडून येतील यासाठी महायुतीच्या नेत्यांनी कसोशीने प्रयत्न केले त्यात ते यशस्वी ठरले.
आजी-माजी आमदारांच्या एकीने पुणे काँग्रेसमध्ये भूंकपाचे संकेत; नव्या नांदीची चाहूल
निवडणुकीचा निकाल जाहीर झाला व महायुतीचे सर्वच सर्व 9 उमेदवार विजयी झाले. परंतु, शरद पवार यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची काही मत फुटल्याची चर्चा रंगली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमची काही मतं फुटली हे मान्य केलं. काँग्रेसच्या आमदारांच्या दगा फटक्यामुळे जयंत पाटलांना पराभवाला सामोरे जावे लागले. याच मुद्द्यावरून माजी काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या व मध्ये असलेल्या उत्कर्ष रूपवते यांनी जोरदार हल्लाबोल केला.
नेहमीप्रमाणे गुप्त मतदानात काँग्रेसची मतं फुटली. इतरांना बी टीम म्हणून बदनाम करणारे आज स्वतःच भाजपाची A टीम निघाले. सामान्य जनतेला लोकसभा निवडणुकीत संविधान बचाव या मुद्द्यावर भावनिक साद घालणारे आज सरळ भारतीय जनता पार्टीला मतदान करत आहेत. जनतेने यातून नक्कीच बोध घ्यावा असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
विधानसभेला कमी जागा घेण्यास तयार, पण उपमुख्यमंत्री पद अन्.. अजितदादांनी महायुतीपुढे ठेवली अट
लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याने काँग्रेस नेते अतिआत्मविश्वासात वावरत होते. राज्यात काँग्रेसच्या जागा वाढल्या होत्या. याचा परिणाम विधानपरिषदेच्या निवडणुकीतही दिसेल असे सांगितले जात होते. मात्र तसे काहीच घडले नाही. मते फुटल्याने काँग्रेस नेते चिडल्याचे दिसत आहे. तसेही काँग्रेस आमदार कैलास गौरंट्याल यांनी कालच प्रसारमाध्यमांना आमच्यातील तीन ते चार आमदार डाऊटफूल आहेत असे सांगत शंका व्यक्त केली होतीच.
या निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेसने आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला आमदार झिशान सिद्दीकी यांना बोलावण्यातच आलं नव्हतं. या प्रकाराचा खुलासा त्यांनी स्वतःच माध्यमांसमोर केला होता. तरी देखील पक्ष श्रेष्ठी जो आदेश देतील त्यानुसार कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतर काहीतरी वेगळेच घडल्याचे दिसत आहे. झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहून आमदार झिशान सिद्दीकी यांची मोठी अडचण झाली आहे.