विधानसभेसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, म्हणाले, ‘सुमनताईनंतर आता रोहितला साथ द्या…’

विधानसभेसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, म्हणाले, ‘सुमनताईनंतर आता रोहितला साथ द्या…’

Sharad Pawar On Rohit Patil : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. सर्वच पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली. अशातच आता शरद पवारांनी (Sharad Pawar) विधानसभेसाठी आपला पहिला उमेदवार जाहीर केला. दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit Patil) यांना आगामी काळात साथ देण्याचं आवाहन त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळकरांना केलं.

बेकायदेशीर कुणबी नोंदणी सुरू, मुख्यमंत्री शिंदे अन् जरांगेंची मिलीभगत…; हाकेंचा गंभीर आरोप 

शरद पवार हे आज सांगलीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आर. आर. पाटील यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलतांना पवार म्हणाले की, आमदार सुमनताई पाटील यांच्यानंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा, येणाऱ्या काळात तुम्ही रोहितला ताकद द्या. चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका आहेत. या विधानसभेत काहीही झालं तरी सत्ता परिवर्तन करायचं, त्यासाठी रोहितला साथ द्या, असं पवार म्हणाले.

खासगी गाडीवर लाल दिवा, चेंबरवरही डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकाऱ्याची वाशिमला बदली 

तासगावमधून सुमनताई पाटील या सध्या आमदार असून त्या आधी स्व. आर. आर. पाटील हे या मतदारसंघाचं नेतृत्व करायचे.

दरम्यान, यावेळी बोलतांना पवारांनी आर आर पाटील यांच्या आठवणीनांही उजाळा दिला. ते म्हणाले, माझी निवड 100 टक्के खरी ठरली आणि आर. आर पाटील यांनी ग्रामविकासमध्ये चांगलं काम केलं. त्यानंतर त्यांच्याकडे गृहखातं दिलं. आता ते निघून गेले. पण रोहित याची कमतरता भरून काढेल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.

नेहरूंवर टीका करणाऱ्यांना जनतेनं नाकारलं…
पुढं बोलतांना पवार म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीवेळी काहीजणाच्या डोक्यात सत्ता गेली होती. डोक्यात गेलेली सत्ता उतरवायची असेल तर लोकांना सोबत घेतलं पाहिजे. आपण लोकसभेमध्ये दहा पैकी आठ जागा निवडून आणल्या. सर्व सामान्य कुटुंबातील निलेश लंके यांना संधी दिली आणि आता ते लोकसभतेत जाऊन बसलेत. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला मतदारांनी 300 जागांवरच रोखलं. नेहरू, इंदिरा गांधींवर टीका करणाऱ्यांना जनतेनं स्वीकारल नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube