बेकायदेशीर कुणबी नोंदणी सुरू, मुख्यमंत्री शिंदे अन् जरांगेंची मिलीभगत…; हाकेंचा गंभीर आरोप

बेकायदेशीर कुणबी नोंदणी सुरू, मुख्यमंत्री शिंदे अन् जरांगेंची मिलीभगत…; हाकेंचा गंभीर आरोप

Laxman Hake on Eknath Shinde : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) ओबीसी आरक्षणातून (OBC reservation) आरक्षण देण्याची आणि सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली. सध्या जरांगे राज्यभर शांतता रॅली काढत आहे. अशातच ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ लढा देणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि जरांगेंवर टीका केली.

सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजितदादा कामाला लागले…. बारामतीत शक्तिप्रदर्शन 

मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात मिलीभभगत असल्याचा गंभीर आरोप हाके यांनी केला.

हाके म्हणाले, राज्यातील शिंदे सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात मिलीभगत आहे. शिंदे सरकार हे ओबीसी समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. बेकायदेशीर कुणबी नोंदणी करत आहे. हा प्रकार त्यांनी वेळीच थांबवला पाहिजे. एकीकडे अठरापगड जातीतील ओबीसी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहा-सहा महिने वाट पाहावी लागत आहे. तर दुसरीकडे मराठा समाजातचील लोकांना हातोहात दाखले देण्यात येत आहेत, असं हाके म्हणाले.

रंजन कुमार शर्मा पुण्याचे पोलीस सहआयुक्त, राज्यातील 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

कोणतीही माहिती नसताना जरांगे आणि त्यांच्या सल्लागारांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आणण्याची डाव आखला. तो मोडीत काढून आपले हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी ओबीसी समाजाने एकजूट दाखवावी, असं आवाहनही हाकेंनी यावेळी केलं.

पुढं बोलतांना ते म्हणाले, लोकसंख्येच्या प्रमाणात मोठा प्रवर्ग असलेल्या ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात फारच कमी आरक्षण आहे. मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाचा हट्ट धरल्यामुळं ते आता धोक्यात आलं. आज घडीला ओबीसी शांत राहिला तर सध्याचं असलेलं आरक्षणही पळवले जाण्याची शक्यता आहे. ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी आपण आरक्षणासाठी लढा देत आहोत, त्यासाठी सरकारला भिडणार, असंही हाकेंनी ठणकावलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube