Harshada Kakade : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि वंजारी समाज समोरासमोर उभे ठाकले आहेत. याचा फटका विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. मात्र, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील जनशक्ती विकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा काकडेंनी (Harshada Kakade) वंजारी समाजाचा आपल्याला फटका बसणार नाही, पंकजा मुंडे जरी राजळेंच्या प्रचाराला आल्या तरी मला फरक पडणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
“राज्यात महायुतीचं सरकार येणार अन् मुख्यमंत्री..”, राज ठाकरेंच्या भाकितावर फडणवीसांचं मोठं विधान
हर्षदा काकडे यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात मराठा-वंजारी समाज मोठा आहे. मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाची मागणी केल्यानं वंजारी समाज नाराज आहे. याचा फटका तुम्हाला फटका बसणार का? असा सवाल केला असता हर्षदा काकडे म्हणाल्या, मला मराठा आणि वंजारी वादाचा अजिबातच फटका बसणार नाही. कारण, वंजारा समाजाला मी त्यांच्या घरातीलच वाटते. माझे वडिल जेव्हा राजकारण करायचे, तेव्हा सर्व समाजाची माणसं त्यांच्यासोबत असायची. त्यात वंजारी, मुस्लिम, गरीब मराठे, धनगर, लमान सर्वच असायचे. हे सर्व समाज मी वडिलांच्या बरोबर कायम पाहिले. माझाही त्यांच्याशी संपर्क आलेला आहे. त्यामुळं वंजारी समाजाला मी बाहेरची वाटत नाही. शिवाय आम्ही सर्वसमावेश भूमिका घेऊन राजकारण करतो, असं हर्षदा काकडेंनी सांगितलं.
सिबील स्कोअर शून्य असेल तर कर्ज मिळेल का? जाणून घ्या, महत्त्वाची माहिती..
लंके मदत करणार का नाही हे त्यांनीच ठरवायचं…
राष्ट्रवादीत सोबत का गेला नाही? असा विचारल्यावर हर्षदा काकडे म्हणाल्या की,
एकदा एक पक्षाने फसवणूक केली की, सर्वच पक्षांवरच भरवसा उठतो. आम्हाला
सुजय विखेकडून त्रास झाला. त्यामुळं निलेश लंकेंना लहान भाऊ म्हणून लोकसभेला मदत केली. आता आम्हाला विधानसभेला मदत करायची की नाही, हे ते ठरवलीत, असं काकडे म्हणाल्या.
साखर सम्राट पावणे पाच वर्ष गायब…
यावेळी बोलताना हर्षदा काकडेंनी भाजप आमदार मोनिका राजळे यांच्यावरही निशाणा साधला. मतदारसंघातील साखर सम्राट पावणे पाच वर्ष ते कुठंतरी असतात. अन् शेवटीची सहा महिने मतदारसंघात फिरत असतात. आतापर्यंत ज्या ज्या घराण्यांना सत्ता मिळाली, त्यांनी मतदारसंघाचा, मतदारसंघातील मंदिराचा विकास करणं अपेक्षित होतं. पण, त्यांनी फक्त देवस्थानांचं राजकारण केल. मात्र, मला संधी मिळाली तर मी शंभर टक्के मंदिराचा आणि मतदारसंघाचा विकास करेन, असंही हर्षदा काकडेंनी सांगितलं