“राज्यात महायुतीचं सरकार येणार अन् मुख्यमंत्री..”, राज ठाकरेंच्या भाकि‍तावर फडणवीसांचं मोठं विधान

“राज्यात महायुतीचं सरकार येणार अन् मुख्यमंत्री..”, राज ठाकरेंच्या भाकि‍तावर फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis on Raj Thackeray Statement : राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) काल एका मुलाखतीत भाकित केलं होतं. राज्यात महायुतीचं सरकार येईल आणि मुख्यमंत्री भाजपाचा होईल असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकारणात सुरू झाली आहे. या चर्चा सुरू असतानाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. राज ठाकरेंच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. राज्यात भाजप नाही तर महायुतीचं सरकार येणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का; रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई महापालिकेतील कांग्रेसचे विरोधी (Congress Party) पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्ट उत्तरे दिली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

फडणवीस पुढे म्हणाले, मी राज ठाकरेंचा आभारी आहे. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करतो. पण राज्यात भाजप नाही तर महायुतीचं सरकार येणार आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्री देखील महायुतीचाच असेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. राज ठाकरे आता भाजपला पाठिंबा देत आहेत. तेव्हा भाजपला मिळणारी उत्तर भारतीय मते दूर जातील का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, राज ठाकरेंनी आता व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे. प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतच आलो आहोत. प्रादेशिक अस्मितेबरोबरच राष्ट्रीय अस्मिता देखील स्वीकारणे गरजेचे ठरते. राष्ट्रीय अस्मिता म्हणजेच हिंदुत्व जे आता राज ठाकरेंनी स्वीकारलं आहे.

Raj Thackray : विधानसभा जिंकू अन् सत्ता आणू..राज ठाकरेंचा निर्धार; विरोधकांना फटकारले

माहिमचं काय होणार

माहिम मतदारसंघातून मनसेने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात शिंदे गटाने सदा सरवणकर यांना तिकीट दिलं आहे. मात्र भाजपन या मतदारसंघात अमित ठाकरेंना मदत करण्याची भूमिका स्वीकारली आहे. एकनाथ शिंदे यांनीही आपला उमेदवार मागे घेऊन अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आम्ही सर्व चर्चा करत आहोत. आम्ही सर्व एकत्र असून यावर मार्ग काढला जात आहे. आज आमची बैठक होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube