अहमदनगर – आगामी विधानसभा निवडणुकासाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय नेत्यांनी जोरदार कंबर कसली. आपापल्या पद्धतीने इच्छुकांसह कार्यकर्ते तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी पक्षाच्या वरिष्ठांच्या भेटीगाठी घेऊ लागले. नगर शहरातील महाविकास आघाडीमध्येही (Mahavikas Aghadi) चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यातच शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड (Vikram Rathod) यांनी मुंबईत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली.
भाजपात बंडखोरीची ठिणगी.., मोनिका राजळेंची उमेदवारी धोक्यात?
नगरची जागा आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीसह काँग्रेसचा देखील या जागेवर डोळा आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात ही जागा कोणाला सुटणार? तसेच आघाडीमधून कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार? याचीच चर्चा मतदारसंघात रंगली. मात्र महाविकास आघाडीने अद्याप नगर लोकसभेसाठी कोणालाही उमदेवारी निश्चित केली नाही. दरम्यान महायुतीकडून अद्याप तरी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचीच उमेदवारी अंतिम मानली जात आहे.
लाठीचार्ज झाल्यावर जरांगे निघून गेले, पण रोहितदादा अन् टोपेंनी पुन्हा आणून बसवलं; भुजबळांचा दावा
विक्रम राठोडांनी घेतली राऊतांची भेट…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कामध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांनी आपापल्या पक्षातील वरिष्ठांकडे चांगलीच फील्डिंग लावल्याचे वेळोवेळी स्पष्ट होतेय. मात्र इच्छुकांची वाढती संख्या महाविकास आघाडीत डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान नुकतेच दिवंगत आमदार अनिल राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड हे काही पदाधिकाऱ्यांसोबत थेट मुंबई येथे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन आले. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राठोड कुटुंबीयापाठोपाठ आघाडीमधून इतरही काही जण इच्छुक आहे.
महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसणार?
लोकसभेत आघाडीला चांगले यश मिळवता आले. त्यामुळं आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या वाढली. मात्र असे असले तरी देखील सर्व इच्छुकांपैकी कोणा एकालाच महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी दिली जाणार आहे. यामुळे आता इतर इच्छुकांपैकी काही अपक्ष लढण्याच्या ठाम भूमिकेत आहे. यामुळे याचा फटका महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवाराला बसणार आहे. या कारणामुळेच महाविकास आघाडी अद्याप या जागेवर कोणत्याही इच्छुकांनाशब्द देत नाही. मात्र इच्छुक जोरदार तयारीत आहे.
आघाडीमधून कोण कोण इच्छुक?
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळवता आले. यामुळे त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला देखील चांगल्या जागा निवडणून येतील असे सर्व्हे देखील समोर आले. यामुळे या अनुकूल वातावरणात आता इच्छुक देखील हात धुवून घेण्यास सज्ज झाले आहे. आघाडीमधून ठाकरे गटातून बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, राष्रवाडीकडून अभिषेक कळमकर, काँग्रेसकडून किरण काळे हे देखील इच्छुक आहे.
तर महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे ही जागा असल्याने सध्या तरी महायुतीकडून अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचेच नाव अंतिम समजले जात आहे.