Download App

Lok Sabha Election : सुजय विखेंना पाठिंबा देणारे उपनेते विजय औटी शिवसेनेतून निलंबित

औटी यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले. शशिकांत गाडे यांनी औटी यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.

  • Written By: Last Updated:

Vijay Auti expelled from Shivsena party: अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी पाठिंबा दिला आहे. विजय औटी (Vijay Auti ) हे विखेंबरोबर आल्याने महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना मोठा झटका बसला आहे. तर सुजय विखे यांचे पारनेरमध्ये पारडे जड झाले आहे. औटी यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानंतर पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी गुरुवारी उशिरा औटी यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.

पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचंच काम करा; जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना सक्त ताकीद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाही समावेश आहे. असे असतानाही औटी यांनी महाविकास आघाडीच्या विरोधातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना पाठिंबा देण्याचा एकतर्फी निर्णय बुधवारी रात्री घोषित केला. निवडणुकीसंदर्भात औटी यांनी दोन दिवसांपूर्वी बोलाविलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार पाठबळ द्यावे अशी भूमिका मांडली होती. मात्र पदाधिकाऱ्यांच्या भावना धुडकावत औटी यांनी विखे यांना पाठिंबा देण्याचा एकतर्फी निर्णय जाहीर केला. औटी यांच्या निर्णयानंतर जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे व इतर पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून गुरुवारी सकाळी बैठकीचे आयोजन केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची संपत्ती घटली, किती आहे श्रीकांत शिंदे यांचं उत्पन्न? वाचा सविस्तर

या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना महाविकास आघाडी सोबत असल्याचे तसेच औटी यांनी परस्पर निर्णय घेतल्याचे सांगितले. बैठकीनंतर आ. निलेश लंके यांच्याशीही गाडे यांनी पदाधिकारी, शिवसैनिक यांची चर्चा घडवून आणत राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये समेट घडून आणला.
राज्यामध्ये महाविकास आघाडी व महाआघाडी यांच्यामध्ये चुरशीने निवडणूक लढवली जात असताना औटी यांनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेबाबत माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार विजय औटी यांचे पक्षातून तातडीने निलंबन करण्यात येत असल्याचे गाडे यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले.

follow us