काय सांगता ? एकमेकांना पाण्यात पाहणारे विजय औटी-निलेश लंके आले एकत्र

  • Written By: Published:
काय सांगता ? एकमेकांना पाण्यात पाहणारे विजय औटी-निलेश लंके आले एकत्र

Apmc Election Parner: ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. या नेत्यांमधील राजकीय वादामुळे पारनेरमध्ये महाविकास आघाडीचे चित्र हे अस्पष्ट होते. पण विजय औटी आणि निलेश लंके यांची दिलजमाई झाली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी भाजपविरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे.

रोहित पवारांना धक्का देणाऱ्या तालुकाध्यक्षाची हकालपट्टी !

एकीकाळी दोघे शिवसेनेत होते. परंतु विधानसभा निवडणुकी अगोदर लंके व औटी यांच्यात वाद झाला. त्यातून लंके हे राष्ट्रवादीत गेले आणि आमदार झाले. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. तो पारनेर नगरपालिकेत दिसून आला आहे. परंतु पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस, ठाकरे गटाचे औटी, भाजपचा असे तीन पॅनेल होण्याची शक्यता होती. तशी तयारी सुरू होती. पण अखेर पारनेरमध्ये महाविकास आघाडी घडून आलेली आहे.

लोकशाही संपली, हा सैतानी साम्राज्याचा उदय; ‘त्या’ प्रकारावर मिटकरी खवळले !

राष्ट्रवादीला आठ, काँग्रेसला पाच, ठाकरे गटाला पाच जागा देण्याचे निश्चित झाले. तर दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते. त्यानंतर औटी आणि लंके एकत्र आल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीचे शेतकरी मंडळ आहे. तर भाजपचे जनसेवा मंडळ आहे. पारनेरमध्ये खासदार सुजय विखे हे वर्चस्व निर्माण करत आहे. त्यांच्याबरोबर सुजीत झावरे, भाजपचे स्थानिक नेते आहेत. विखेंना रोखण्यासाठी हे दोघे एकत्र आल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. हे दोघे एकमेंकांना काय पाण्यात पाहत आले आहेत. एकमेंकावर दोघे जोरदार टीका करत होते. त्यामुळे हे दोघे एकत्र येऊ शकत नाही, असे बोलले जात होते. परंतु कट्टर विरोधक झालेले हे दोघे एकत्र आले आहेत, याची राजकीय चर्चा जोरदार सुरू झालेली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube