लोकशाही संपली, हा सैतानी साम्राज्याचा उदय; ‘त्या’ प्रकारावर मिटकरी खवळले !

लोकशाही संपली, हा सैतानी साम्राज्याचा उदय; ‘त्या’ प्रकारावर मिटकरी खवळले !

Amol Mitkari on Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराकडे संघर्ष यात्रा घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचे राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकारावर राष्ट्रवाादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मिटकरी म्हणाले, ज्यावेळी शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले त्यावेळी राज्यातील लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे आज अकोला ते नागपूरपर्यंत पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी अटक केली ते आहे.

मोदी मुंबईत आल्यानं काहींना पोटदुखी…शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल

ते पुढे म्हणाले, देशमुख हे आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी चालले होते मात्र त्यांना रोखण्यात आले व त्यांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. गृहमंत्र्यांच्या दडपशाहीखाली पोलीस प्रशासन देशमुख यांना बेकायदेशीर ताब्यात घेतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करतात. त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होईल अशी वागणूक देतात, असा आरोप त्यांनी केला.

शिवसैनिकांना अमानुष वागणूक दिली जात आहे. मात्र चार दिवस सासूचे असतात तर चार दिवस सुनेचे असतात. म्हणून एकदा आमचे महाविकास आघाडीचे सरकार आले की तुमच्या या कृत्यांची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मिटकरी यांनी दिला.

दरम्यान, आज सकाळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आमदार देशमुख यांनी जलसंघर्ष यात्रा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. या प्रकारावर विरोधी पक्षांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. विरोध पक्षातील आमदारांनी सरकारच्या या दडपशाहीच्या कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube