पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचंच काम करा; जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना सक्त ताकीद

पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचंच काम करा; जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना सक्त ताकीद

Jayant Patil Sangli Speech : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघात विशाल पाटी (Vishal Patil) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीत कोणाचं काय करायचं, याविषयी संभ्रम आहे. अशातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्याला कार्यकर्त्यांना चांगलीच ताकीद दिली. माझ्या सोबत आणि माझ्या पक्षात राहायचं असेल तर चंद्रहार पाटलांचं काम केलं पाहिजे, असं पाटील म्हणाले.

मोदींची आणि दारूड्याची वृत्ती सारखीच, त्यांना आणखी 5 वर्षे दिल्यास देश कंगाल..; आंबेडकरांचे टीकास्त्र 

सामान्य माणूस भाजपच्या विरोधात
चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सांगलीत सभा झाला. या सभेला कॉंग्रेस नेते विश्वजित कदम, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, महाविकास आघाडीचे उमदेवार चंद्रहार पाटील, मिलिंद नार्वेकर आदि नेते उपस्थित होते. या सभेला संबोधित करतांना पाटील म्हणाले की, देशातील सामान्य माणूस आज भाजपच्या विरोधात आहेत. लोकांच्या मनात भाजपविषयी रागाची भावना आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रात फिरत आहे, या दोन्ही नेत्यांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे. मराठी माणसांनी तयार केलेले दोन पक्ष फोडण्याचं प्रायश्चित भारतीय जनता पक्षाला मतदार या निवडणूकीत देतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रहार पाटलांच्या पाठीशी उभं राहा…
पुढं बोलतांना ते म्हणाले, सांगली मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेवदारी दिली. हा केवळ त्या पक्षाचा निर्णय तर तर महाविकास आघाडीचा निर्णय आहे. एकदा एखाद्या पक्षाला जागा दिल्यानंतर त्यावर चर्चा न करता भाजपला पराभूत करण्यासाठी आता चंद्रहार पाटलील यांच्या पाठीशी उभं राहावं लागले, असं पाटील म्हणाले.

मोदींची आणि दारूड्याची वृत्ती सारखीच, त्यांना आणखी 5 वर्षे दिल्यास देश कंगाल..; आंबेडकरांचे टीकास्त्र 

पाटील म्हणाले, कोणाची तरी या मतदारसंघातून लोकसभा लढायची इच्छा होती, पण ती मान्य झाली नाही. त्यामुळं आपण आपली लढाईची दिशा बदलू शकत नाही. आपण एकसंघपणे चंद्रहार पाटलांच्या मशालीचं काम करायला पाहिजे. स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा करायला लागलो तर पंचाईत होईल, माझ्या पक्षात राहून माझ्या सोबत काम करायचं असेल तर तुम्ही चंद्रहार पाटलांचं काम केलं पाहिजे, त्यांनी दुसरं इकडं – तिकडं केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहिल, अशी ताकीद पाटील यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube