मोदींची आणि दारूड्याची वृत्ती सारखीच, त्यांना आणखी 5 वर्षे दिल्यास देश कंगाल..; आंबेडकरांचे टीकास्त्र

मोदींची आणि दारूड्याची वृत्ती सारखीच, त्यांना आणखी 5 वर्षे दिल्यास देश कंगाल..; आंबेडकरांचे टीकास्त्र

Prakash Ambedkar On PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर सातत्याने टीकेच्या फैरी झडत आहेत. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) घणाघाती टीका केली आहे. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळ्याकुट्ट काळात देशातील कर्जाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दारूच्या व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची संपत्ती संपवून टाकतात. तसं दारूड्याची वृत्ती आणि मोदींची वृत्ती एकच आहे, त्यांना आणखी पाच वर्षे दिली तर ते देशाला कंगाल करतील, अशी टीका आंबेडकरांनी केली.

Sunetra Pawar : एकत्र मिळून तोडगा काढू, कमिन्सच्या कामगारांना सुनेत्रा पवारांचा शब्द 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची सोलापूर, माढा आणि बार्शी येथे जाहीर सभा झाल्या. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी एका व्यक्तीवर 26 रुपये कर्ज होते. मात्र ते आता 96 रुपये झाला असल्याचे जागतिक बँकेचे म्हणणे आहे. वडिलोपार्जित सोनं, जमीन-जुमला आपण सहसा विकत नाही. दारूच्या व्यसनात बुडालेले लोक बापजाद्यांची संपत्ती संपवून टाकतात. दारूड्याची नोकरी गेल्यावर तो काय करतो? तर तो चोऱ्या करतो. घरातील सामान विकतो. त्यामुळे दारूड्याची वृत्ती आणि मोदींची वृत्ती सारखीच आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली.

खासदार राजेंद्र गावितांचा पालघरमधून पत्ता कट? भाजपकडून ‘या’ दोन नावांची चर्चा 

मोदींचे राज्य हे केवळ वसुली राज्य
मोदींचे राज्य हे केवळ वसुली राज्य आहे. राजकारणी, व्यापारी, उद्योजकांवर छापे टाकून इलेक्टोरल बाँडच्या स्वरूपात वसुली केली जात आहे. गेल्या दहा वर्षांत हेच आपण पाहत आहोत. त्यामुळेच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक कोणत्या तोंडाने मत मागणार आहेत, असा सवालही आंबेडकरांनी केला.

मोदींच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व नाकारले आहे. ते सर्व परदेशात स्थायिक झाले आहेत, या आरोपाचा पुनरुच्चार करून आंबेडकर म्हणाले, या 17 लाख कुटुंबाची मालमत्ता 50 कोटी रुपये होती. राज्यसभेच्या रेकॉर्डवर चा गोष्टी आलेल्या आहेत. या लोकांनी नागरित्व सोडण्याचं कारण म्हणजे, यांना मागितलेला हप्ता, असा आरोपही आंबेडकरांनी केला.

मोदींची वागणूक हुकूमशहासारखी आहे
मोदींना आणखी पाच वर्षे दिली तर ते देशाला कंगाल करतील, असा आरोपही आंबेडकरांनी केला. तुम्ही आंदोलन करा, किंवा काहीही करा. देशात लोकशाही आहे. पण पंतप्रधान हुकूमशहाप्रमाणे वागतात, अशी टीका आंबेडकरांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube