Download App

अहिल्यानगरच्या तरूणाकडून अमेरिकेतील महिलेची फसवणूक; क्रिप्टो करन्सीतून 14 कोटींना लुबाडलं

Ahilyanagar च्या तरूणाने थेट अमेरिकेतल्या महिलेशी ऑनलाईन पद्धतीने क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमांतून तब्बल 14 कोटींना फसवलं आहे.

youngster from Ahilyanagar cheated an American woman; 14 crores were looted from cryptocurrency: आंध्र प्रदेश राज्यातील मंगलागिरी पोलीस ठाण्यात क्रिप्टो करन्सी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही फसवणूक थेट अमेरिकेतल्या महिलेची आहे. तसेच तिचं कनेक्शन आता थेट अहिल्यानगरशी निघालं आहे. या प्रकरणी अहिल्यानगरच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

हृतिक VS एनटीआरचा थरार! ‘वॉर 2’ च्या ‘जनाब ए आली’ झलक प्रदर्शित

या गुन्ह्यातील प्रमुख फरार असलेला संशयित आरोपी अभिजीत संजय वाघमारे (वय 31, रा. विराज कॉलनी, अहिल्यानगर) याला तोफखाना पोलिसांच्या पथकाने अटक केली. ही कारवाई आंध्र प्रदेश राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने करण्यात आली.

किड्या-मुंग्यांसारखी माणसं मारली, महादेव मुंडेंची फक्त 12 गुंठ्यासाठी…; धसांनी सगळंच काढलं

याबाबत अधिक माहिती अशी, आंध्र प्रदेश राज्यातील मंगलगिरी पोलीस ठाण्यात अमेरिकेतील महिलेच्या 14 कोटींची ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आंध्र प्रदेशच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. या गुन्ह्यात अभिजीत वाघमारे हा फरार झाला होता व त्याचा शोध पोलीस पथक घेत होते.

केक कटींग अन् स्टेटस ठेवत झाली गायब; पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल

संशयित आरोपी हा महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये असल्याचे आंध्र पोलिसांना समजले. या संशयित आरोपीच्या अटकेसाठी आंध्र प्रदेशमधून विशेष पथक अहिल्यानगरमध्ये दाखल झाले होते. तोफखाना पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांच्या पथकासोबत समन्वय साधून शोधमोहीम राबवली.

माधुरीची घरवापसी होणार! अंबानींचा यू-टर्न

फसवणुकीचा गुन्ह्यातील संशयित आरोपी अभिजीत वाघमारे हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने त्याचा हा डाव हाणून पाडला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले.

follow us