Download App

नॉट रिचेबल मुश्रीफ अखेर घरी परतले; ईडी चौकशीसाठी…

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे सध्या ईडीच्या चौकशांच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कागल येथील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर आज चौकशीसाठी मुश्रीफ यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते. यामुळे तर्कवितर्क लावले जात होते. यातच तब्बल 52 तासानंतर अखेर हसन मुश्रीफ हे कागलमध्ये दाखल झाले आहे. मात्र आपण ईडीच्या कार्यालयात आज जाणार नसल्याचे यावेळी मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे माजी मंत्री हसन मुश्रीफ हे अडचणीत सापडले आहे. मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर तब्बल तीनवेळा ईडीने छापा टाकला आहे. नुकताच टाकण्यात आलेल्या छाप्यावेळी मुश्रीफ हे घरी नव्हते. ईडीच्या कारवायांविरोधात मुश्रीफ यांचे कुटुंबीय देखील संतापले होते. दरम्यान त्यानंतर गेले अनेक तास हसन मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते.

Budget session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून होतोय सुरू

मुश्रीफ यांना ईडीने चौकशीसाठी आज कार्यालयात हजर राहण्याबाबतचे समन्स बजावले होते. मुश्रीफ हजर राहणार का? असे तर्कवितर्क लावले जात असताना आज मुश्रीफ हे आपल्या कागल निवासस्थानी हजर झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘नॉट रिचेबल’ हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात हजर राहणार का?

मुश्रीफ म्हणाले, आज ईडीने समन्स बजावले होते. मात्र आपण आपल्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी कागलमध्ये आलो असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मुश्रीफ यांना आज ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश समन्समधून देण्यात आले आहे. मात्र, ते वकिलांच्या माध्यमातून आपली बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आपण महिनाभराची मुदतवाढ मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे किमान आज तरी मुश्रीफ हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे समजते आहे.

Tags

follow us