New provisions of the Income Tax Department : नव्या तरतुदीनुसार आयकर कायद्यातील (Tax) जर तुम्ही कर चुकवत असल्याचा संशय आयकर विभागाला आल तर ते अधिकारी बिनदिक्कत तुमच्या ईमेल्स, ट्रेडिंग आणि सोशल मीडिया अकाऊंटची छाननी करू शकतात. कायद्यानेच त्यांना हा अधिकार दिला आहे.
नवीन आयकर कायद्यातील कलम २४७नुसार एखादी व्यक्ती करचोरी करत आहे किंवा कर चुकवण्याचा प्रयत्न करत आहे, अफरातफरी करत आहे, असा संशय आयकर विभागाला आला तर अधिकारी तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या ‘Virtual Digital Space’ म्हणजेच आभासी डिजिटल मालमत्तेवर धाड टाकू शकतात. त्याची छाननी करू शकतात.
आयकर विधेयक 2025, कायदा झाल्यास ;या मोठ्या गोष्टी बदलणार
या कलमातील मसुद्यात म्हटले आहे की, व्हर्च्युअल डिजिटल स्पेस या व्याख्येत ईमेल सर्व्हर, सोशल मीडिया अकाउंट्स, ऑनलाइन गुंतवणूक खाती, ट्रेडिंग खाती, बँकिंग खाती आणि कोणत्याही मालमत्तेच्या मालकीची माहिती साठवण्यासाठी वापरली जाणारी कोणतीही वेबसाइट यांचा समावेश आहे.
त्यातच पुढे म्हटलं आहे की, व्हर्च्युअल डिजिटल स्पेस म्हणजे एक वातावरण किंवा संगणक तंत्रज्ञानाद्वारे तयार केला गेलेला एक आभासी परिसर त्यात भौतिक, मूर्त जग नाही मात्र त्यात डिजिटल विश्वाचा समावेश आहे. संगणक तंत्रज्ञान आणि प्रणाली म्हणजेच सॉफ्टवेअर्स वापरून त्यात जगभरात कोणाशीही संवाद साधता येतो, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती तयार करता येते, साठवता येतो, देवाणघेवाण करता येते.
ईमेल सर्व्हर
सोशल मीडिया अकाउंट
ऑनलाइन गुंतवणूक अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, बँकिंग अकाउंट इ.
कोणत्याही मालमत्तेच्या मालकीविषयक माहिती साठवण्यासाठी वापरलेली वेबसाइट
रिमोट सर्व्हर किंवा क्लाउड सर्व्हर
डिजिटल अॅप्लिकेशन प्लॅटफॉर्म