Download App

रोहित पवार, राजेंश टोपेंसारखे उमेदवार पाडणार; हाकेंचा इशारा अन् ‘त्या’ उमेदवारांची यादी तयार

Laxman Hake on Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणाला किती जागा मिळणार याचीही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत. यातच आता लक्ष्मण हाके यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मविआ आणि महायुतीत अस्वस्थता वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत कोणते उमेदवार पाडायचे, 50 जणांची यादी आमच्याकडे तयार आहे असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केले.

video : दारू पिण्याची वेळ संध्याकाळी 7 वाजताची असते का? व्हायरल व्हिडिओवर काय म्हणाले हाके?

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

माझी विदर्भातील ओबीसी नेत्यांना विनंती आहे की हैदराबाद गॅझेट किंवा अन्य बाबतीतून मुख्यमंत्री ओबीसी आरक्षण घालवतील. ओबीसी आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे राज्यातील सामान्य ओबीसींच्या हितासाठी आता नेत्यांनी समोर आलं पाहिजे. विदर्भ ओबीसी चळवळीत कुठेही मागे पडणार नाही. ओबीसी आरक्षण कोणत्याही परिस्थितीत टिकलं पाहिजे असे लक्ष्मण हाके म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणते उमेदवार पाडायचे हे आमचं ठरलं आहे. 50 उमेदवारांची यादी सुद्धा आम्ही तयार केली आहे. मनोज जरांगेंना ज्यांनी मदत केली. रसद पुरवली त्या लोकांना आम्ही निवडणुकीत पाडणार. रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार आम्ही पाडणार असा इशारा हाके यांनी यावेळी दिला. ओबीसींच्या हिताची भूमिका घेणारे उमेदवार आता विधानसभेत दिसतील. यासाठी लक्ष्मण हाके आता थेट रस्त्याव उतरून लढाई लढताना दिसेल असेही हाके यावेळी म्हणाले.

जरांगे एकही उमेदवार उभा करणार नाहीत, त्यांची शरद पवार अन् CM शिंदेंशी कमिटमेंट, हाकेंचा दावा 

follow us