Old Citizens : अतिवृद्ध ( Old Citizens) असणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण राज्य सरकारने अतिवृद्धांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या अतिवृद्ध नागरिकांच्या सेवानिवृत्ती वेतनात वाढ करण्यात येणार आहे. यामध्ये या नागरिकांच्या वयाच्या टप्प्यानुसार हे वेतन वाढणार आहे.
नागरिकांच्या वयाच्या टप्प्यानुसार हे वेतन वाढणार…
यामध्ये 80 ते 85 वयादरम्यानच्या सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्ये 20 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तर 85 ते 90 या दरम्यान वय असणाऱ्या वृद्धांच्या पेन्शन 30 टक्क्यांनी वाढवणार आहे. 90 ते 95 वर्षे वय असल्यास त्या कर्मचाऱ्यांची पेन्शन 40 टक्क्यांनी वाढणार आहे. तर 95 ते 100 वर्षांच्यावर वय असणाऱ्या व्यक्तींना 50 टक्के वाढीव पेन्शन मिळणार आहे. तसेच शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असणारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वाढीव पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे निवृत्त अतिवृद्ध व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे.
Corona Update : कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; राज्यात 24 तासांत 11 नवे रूग्ण, मुंबईत सर्वाधिक रूग्ण
दरम्यान अनेक सेवेनिवृत्त अतिवृद्ध कर्मचाऱ्यांना दुर्धर आजारांचा सामना करावा लागतो. तसेच त्यांच्या वृद्धापकाळाची पुंजी म्हणजे पेन्शन असते. ज्यावर ते त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरचा काळ सहज आणि त्रासाविना घालवू शकतात. तसेच पाल्यांकडून होणारी हेळसांड यासाठी देखील सेवानिवृत्त वृद्धांच्या आयुष्यात पेन्शन मोठा आधार असते. त्यामुळे सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.
RSS : जातनिहाय जनगणना करण्यास संघाचा विरोध? गाडगे म्हणाले, जात विस्मरणात जाऊ द्या…
दरम्यान राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) नागपुरात सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेची मागणी (Old Pension Scheme) करत सरकारची कोंडी केली होती. त्यावर अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेंनी 13 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील माहिती दिली. तसेच त्यावर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल. असं अश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.