2029 मध्ये 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकणार; ओमराजे निंबाळकरांनी स्वीकारलं चॅलेंज!

Omraje Nimbalkar : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून आपण 2029 च्या लोकसभा निवडणुकीत 3 लाख 46 हजार 847 मतांच्या फरकाने निवडून

Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar

Omraje Nimbalkar : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून आपण 2029 च्या लोकसभा निवडणुकीत 3 लाख 46 हजार 847 मतांच्या फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वास एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित खासदार नोकरी महोत्सव 2026 या कार्यक्रमात ओमराजे निंबाळकर बोलत होते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत ( Loksabha Election 2024 ) मी 3 लाख 29 हजार 846  मतांच्या फरकाने निवडून आले होते. आता 2029 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election  2029) आपण 3 लाख 46 हजार 847 किंवा मागील मताधिक्यापेक्षा जास्त मतांच्या फरकाने निवडून येईल. मी हे कामाच्या जोरावर आज बोलत आहे. तुमची कामे केली असतील तरंच तुम्ही मला मतदान करा असं या कार्यक्रमात बोलताना ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) म्हणाले. तसेच धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात मोठ्या उद्योगांसह लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळावी, स्थानिक अर्थव्यवस्था बळकट व्हावी आणि जिल्ह्याची औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी यासाठी राज्याच्या उद्योग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असं देखील यावेळी ओमराजे निंबाळकर म्हणाले.

1,220 खेळाडूंची नोंदणी; ‘या’ दिवशी होणार IPL 2027 साठी मिनी लिलाव –

तर दुसरीकडे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तरुण – तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये विविध शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर या कार्यक्रमात बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी धाराशिव जिल्ह्यात लॉजिस्टिक्स पार्क, संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक साहित्य व उपकरणे निर्मिती करणारे उद्योग तसेच विविध रोजगाराभिमुख उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचे आश्वासन दिले.

Exit mobile version